हायलाइट्स:
- अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचे विरोधकांना प्रत्युत्तर.
- आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर नाहीच नाही- नवाब मलिक.
- ज्यांच्या बेनामी संपत्ती आहेत ते माझ्याकडे बोट दाखवत आहेत.असे चोर लोक माझ्याकडे बोट दाखवत आहेत- मलिक.
नवाब मलिक हे गोंदिया जिल्हयाच्या दौर्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुंबईतील कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी भाष्य केले.
क्लिक करा आणि वाचा- मलिकांचा वानखेडेंवर पुन्हा गंभीर आरोप; एनसीबी महासंचालकांकडे करणार तक्रार
मलिक म्हणाले की, या देशात कायद्याने माझ्या कुटुंबाला व्यापार करण्याचा अधिकार दिलेला आहे. माझ्याकडे जे काही आहे ते सर्व कागदोपत्री उपलब्ध आहे. ज्यांच्या बेनामी संपत्ती आहेत ते माझ्याकडे बोट दाखवत आहेत. सोशल मिडियावर लाल गाठोडे दाखवत आहेत. असे चोर लोक माझ्याकडे बोट दाखवत आहेत. मी भंगारवाला आहे. अशी शंभर टन रद्दी माझ्याकडे आहे. आम्ही चोर नाही आहोत. डाकूंकडून आम्ही सोने घेतलेले नाही. बँका बुडवून कोणी कोणी कुठे काय केलेले आहे, त्या वानखेडेंशी कोणाचा काय संबंध आहे? कोणत्या हॉटेलचे कोण मालक आहेत?, त्या हॉटेलमधून क्रूझवर काय कसे गेले?, त्या हॉटेलच्या कॅटरिंगमध्ये ड्रग्ज कसे गेले?, असे सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केले आहेत.
क्लिक करा आणि वाचा- दिलासा; राज्यात आज करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटली; बरे होणारे रुग्ण वाढले
इतके का घाबरता आहात? आता नाव घ्यायला मी सुरुवात केलेली आहे. तुम्ही सांगताय की लाल पकडे सोशल मीडियावर टाकून नवाब मलिक घाबरतील. पण नवाब मलिक यांचे मुले असतील, भाऊ असतील मुली असतील, कितीही शोधा आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. आणि चोरांना तर अजिबात घाबरत नाही.
क्लिक करा आणि वाचा- परमबीर सिंग हाजिर हो! कोर्टाने काढले अजामीनपात्र अटक वॉरंट