भारतीय संघाला मिळाली गुड न्यूज; न्यूझीलंडविरुद्धच्या विजयासाठी…


दुबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील भारतीय संघाची सुरुवात खराब झाली असली तरी टीम इंडियाची ओळख कमबॅक करणारा संघ अशी आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीसाठी जोरदार तयारी करत आहे. उद्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत विजय मिळून भारत सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जिंवत ठेवले. पण जर या सामन्यात पराभव झाला तर मात्र भारताचे सेमीमध्ये पोहोचण्याचा मार्ग अवघड होईल. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध २००३ साली अखेरचा विजय मिळवला होता.

वाचा-कोहलीनंतर पाकिस्तानी पत्रकाराचा या कर्णधाराला बेताल सवाल; खेळाडू परिषदेतून उठून गेला

उद्याच्या लढतीत न्यूझीलंड संघाकडे आत्मविश्वास अधिक असेल यात कोणतीही शंका नाही. पण भारतीय संघासाठी एक गुड न्यूज आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचे रेकॉर्ड शानदार आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताला न्यूझीलंडचा पराभव करण्यास १० वर्ष लागली होती. भारताने न्यूझीलंडचा नोव्हेंबर २०१७ साली पहिल्यांदा टी-२० सामन्यात पराभूत केले होते. दिल्लीत झालेल्या सामन्यात भारताने २०३ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या लढतीत न्यूझीलंडने ४० धावांनी विजय मिळवाल. तर तिसरी लढत पावसामुळे भारताने जिंकली होती. तेव्हा टीम इंडियाने ३ सामन्यांची मालिका २-१ने जिंकली होती.

वाचा- दिग्गज खेळाडूकडून झाली मोठी चूक; १ चेंडूवर दिल्या १० धावा

भारतीय संघ २०२० मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. तेव्हा झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने ५-० अशा दणदणीत विजय मिळवला होता. न्यूझीलंडला घरच्या मैदानावर एकही विजय मिळवता आला नव्हता. तेव्हा चार विजय विराटच्या नेतृत्वाखाली मिळाले होते. तर अखेरच्या सामन्यात केएल राहुलने नेतृत्व केले होते. विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध आतापर्यंत ७ सामन्यात नेतृत्व केले आहे, त्यापैकी ६ मध्ये विजय तर फक्त एकात पराभव मिळाला आहे.

वाचा- धावा करता येत नाही म्हणून कर्णधाराने मैदान सोडले; पाहा टी-२० वर्ल्डकपमधील प्रकारSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: