रोनाल्डो दुसऱ्यांदा होणार जुळ्यांचा बाप; गर्लफ्रेंडसोबत फोटो शेअर करत दिली गुड न्यूज


मुंबई : पोर्तुगाल आणि मँचेस्टर युनायटेडचा स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा एकदा जुळ्या मुलांचा बाप होणार आहे. या ३६ वर्षीय फुटबॉलपटूने इंस्टाग्रामवर पार्टनर जॉर्जिना रॉड्रिग्जसोबतचा एक फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. रोनाल्डोने फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आम्ही जुळ्या मुलांचे पालक होणार आहोत, हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे. आमचे हृदय प्रेमाने भरून गेले आहे.” या फोटोमध्ये रोनाल्डोच्या हातात अल्ट्रासाऊंडद्वारे टिपलेले फोटो दिसत आहेत.

वाचा- भारतीय संघाला मिळाली गुड न्यूज; न्यूझीलंडविरुद्धच्या विजयासाठी…

रोनाल्डोने पोस्टमध्ये दोन फोटो अपलोड केले आहेत. दुसऱ्या फोटोत तो त्याच्या ४ मुलांसोबत स्विमिंग पूलमध्ये बसलेला दिसत आहे. रोनाल्डो आणि जॉर्जिना रॉड्रिग्ज गेल्या ५ वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये आहेत. जॉर्जिनाचा जन्म अर्जेंटिना येथे झाला असून त्यांना एलाना मार्टिना नावाची ३ वर्षांची मुलगी देखील आहे. आता हे जोडपे आणखी २ मुलांचे पालक होणार आहेत. रोनाल्डोचा मोठा मुलगा ११ वर्षांचा आहे. त्याचे नाव ख्रिस्तियानो ज्युनियर आहे. रोनाल्डो ज्युनियरचा जन्म २०१० मध्ये सरोगसीद्वारे झाला. रोनाल्डोने अद्याप त्याच्या मोठ्या मुलाच्या आईबद्दल कोणतीही माहिती सार्वजनिक केलेली नाही.

वाचा- धावा करता येत नाही म्हणून कर्णधाराने मैदान सोडले; पाहा टी-२० वर्ल्डकपमधील प्रकार


रोनाल्डोला व्हायचंय ७ मुलांचा बाप
याआधी रोनाल्डो २०१७ मध्ये जुळ्या मुलांचा बापही झाला आहे. त्यांची नावे इवा आणि माटेओ आहेत. जॉर्जिनाने नोव्हेंबर २०१७ मध्ये मुलगी एलाना मार्टिनाला जन्म दिला. इलाना या जगात आल्यानंतर रोनाल्डोची जुळी मुले इवा आणि माटेओ यांचा जन्म झाला. रोनाल्डोने २०१७ मध्ये कबूल केले की त्याला ७ मुले हवी आहेत, तर जॉर्जिनाने गेल्या वर्षी सांगितले होते की, मला आणखी मुले असावीत, अशी माझी इच्छा आहे.

वाचा- दिग्गज खेळाडूकडून झाली मोठी चूक; १ चेंडूवर दिल्या १० धावा

जॉर्जिनासोबत ५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे रोनाल्डो
रोनाल्डो आणि जॉर्जिना २०१६ पासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांची पहिली भेट माद्रिदमधील गुच्ची शोरूममध्ये झाली होती. जिथे जॉर्जिना सेल्समन म्हणून काम करायची. जॉर्जिना प्रसिद्ध फॅशन ब्रँड गुच्चीची मॉडेल देखील राहिली आहे. जॉर्जिनाला डेट करण्यापूर्वी रोनाल्डो अनेक मॉडेल्ससोबत रिलेशनशिपमध्ये होता.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: