हायलाइट्स:
- अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाने माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट.
- गोरेगाव खंडणी प्रकरणात कोर्टाने काढले हे अजामीनपात्र अटक वॉरंट.
- कालच ठाणे न्यायालयाने सिंग यांच्या विरोधात वॉरंट काढले होते.
परमबीर सिंग यांच्यावर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. इतकेच नाही तर सिंग यांच्या विरुद्ध लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. मात्र तपास यंत्रणांना अद्याप त्याचा शोध घेता आलेला नाही. म्हणूनच ठाणे न्यायालयानंतर आता मुंबईच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
क्लिक करा आणि वाचा- परमबीर सिंग यांना कोर्टाचा मोठा धक्का; अजामीनपात्र वॉरंट जारी
गुरुवारी ठाणे न्यायालयाने परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. तसेच बुधवारी महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंग यांच्या विरोधात कठोर पावले उचलत त्यांचा पगार रोखण्याचा निर्णय घेतला. वसुली प्रकरणातील आरोपी असलेले परमबीर सिंग हे आयपीसीच्या अनेक कलमांअंतर्गत आरोपी आहेत आणि हे लक्षात घेत आरोपीला अटक करून कोर्टात हजर करावे, असे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
क्लिक करा आणि वाचा- शरद पवारांची पाठ फिरताच विखेंच्या लोणीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना अँटिलिया स्फोटके प्रकरणी आरोपी करण्यात आले होते. यानंतर परमबीर सिंग रजेवर गेले होते. मात्र तेव्हा पासूनच ते बेपत्ता आहेत. महाराष्ट्र सरकार परमबीर सिंगचा शोध घेत आहे. त्यासाठी राज्य सरकार अनेक प्रकारे प्रयत्न करत आहे. याशिवाय मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांना फरार घोषित करण्याचाही महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘मी कोणाचा दुश्मन नाही, सभासदांची जिरवू नका’; उदयनराजे संतापले
परमबीर देश सोडून पळून गेले?
परमबीर सिंग यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी आतापर्यंत अनेकदा समन्स बजावण्यात आले आहेत. पण ते एकदाही हजर झालेले नाहीत. अद्यापही त्यांचा कोठेच काही सुगावा लागलेला नाही. परमबीर सिंग देश सोडून पळून गेले असावेत, असा संशय तपास यंत्रणांना आहे.