‘मला तर तुम्हीच आवडता…’; लहान मुलीनं नीरज चोप्राला दिलं मजेदार उत्तर


पानिपत : ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक अँड फील्ड प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राची सध्या सगळीकडे चर्चा आहे. नुकतीच त्याची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे, पण यशाचा उच्चांक गाठल्यानंतरही नीरज नम्र आहे. तो किती नम्र माणूस आहे, याची झलक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून दिसून येते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनात या स्टार खेळाडूबद्दल आदर आणखी वाढला आहे. हा व्हिडिओ पानिपत स्टेडियममधील आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नीरज चोप्रा एका चिमुरडीशी बोलताना दिसत आहे. नीरजने तिला एका खेळाडूचे नाव शोधण्यास सांगितले, पण मुलीच्या उत्तराने सगळ्यांची मनं जिंकली. तिचा आवडता नायक, खेळाडू नीरज चोप्रा आहे, असं त्या मुलीनं उत्तर दिल्यानंतर मैदानात उपस्थित सर्वांनी आनंद व्यक्त केला. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी पंकज नैन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

व्हिडिओ शेअर करताना नैन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मला तर तुम्हीच आवडता. पानिपत स्पोर्ट्स स्टेडियममध्ये मुलांशी संवाद साधताना नीरज चोप्रा. या माणसाची नम्रता आणि साधेपणा पाहा. चॅम्पियन, तुला खूप पुढे जायचे आहे.”

नीरज चोप्राचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. नेटकऱ्यांनाही नीरजचा साधेपणा आवडला आहे. एका यूजरने लिहिले की, ‘हा माणूस खरा हिरो आहे.’ तर दुसर्‍याने लिहिले आहे की, ‘खरोखर हृदयाला स्पर्श करणारा व्हिडिओ.’

दरम्यान, नीरज चोप्राने या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला होता. अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो देशातील पहिला अॅथलीट ठरला. त्याने ८७.५८ मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो अभिनव बिंद्रानंतर दुसरा भारतीय ठरला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: