फाइलमागे ५ हजार रुपये वसुलीचं टार्गेट?; अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमुळं खळबळ


अमरावती: जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितीमधील (Tivsa Panchayat Samiti) रोजगार हमी योजना विभागात कंत्राटी पद्धतीवर अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या प्रमोद निंबोरकर यांच्या अपघाती मृत्यूनं खळबळ उडाली आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केल्यानं ते तणावाखाली होते. आपल्या मनातील भावना त्यांनी बोलूनही दाखवल्या होत्या. त्यानंतर काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं या प्रकरणाचं गूढ वाढलं आहे.

वाचा: बुलडाण्यात स्टेट बँकेवर मोठा दरोडा, चोरट्यांनी आख्खी तिजोरी साफ केली!

अमरावतीच्या वरुड तालुक्यातील प्रमोद भिमरावजी निंबोरकर हे पंचायत समिती तिवसा येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभागात तांत्रिक विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डाॅ. चेतन जाधव यांनी निंबोरकर यांच्या कार्यमुक्तीचा प्रस्ताव रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांना पाठविला होता. राम लंके यांनीही कुठलीही शहानिशा न करता व निंबोरकर यांना बाजू मांडण्याची संधी न देता जिल्हाधिकाऱ्यांकडं प्रस्ताव सादर केला. त्यामुळं त्यांची नोकरी गेली. त्यानंतर अचानक वरुडच्या बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोर्शी-वरूड रोडवर त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

वाचा: हिंमत असेल तर नारायण राणेंनी…; विनायक राऊतांचं जाहीर आव्हान

मृत्यूपूर्वी प्रमोद निंबोरकर यांनी उपजिल्हाधिकारी राम लंके यांना फोन करून आपली व्यथा मांडली होती. तिवसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सिंचन विहिरीच्या प्रत्येक फाईल मागे पाच हजार रुपये गोळा करण्यास सांगत आहेत, असं निंबोरकर यांनी म्हटल्याचं ऑडिओ क्लिपमधून समोर आलं आहे. या घटनेनं अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. निंबोरकर यांचा मृत्यू हा अपघात आहे की आत्महत्या, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

वाचा: नवाब मलिक यांना अशीच पिढी घडवायची आहे; माजी खासदार भडकलाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: