Jharkhand: सीबीआयनं आरोपपत्र लिहिलंय की कांदबरी?, हायकोर्टाचा उद्विग्न सवाल


हायलाइट्स:

  • न्यायाधीश उत्तम आनंद मृत्यू प्रकरण
  • तपासात सीबीआयचा ढिसाळपणा समोर
  • झारखंड उच्च न्यायालयाचे चौकशीवर ताशेरे

रांची : झारखंडच्या धनबादचे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या अप्राकृतिक मृत्यू झारखंड उच्च न्यायालयानं सीबीआयच्या तपासावर ताशेरे ओढलेत. केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रावरही उच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. हे आरोपपत्र दोन आरोपींविरुद्ध हत्येच्या आरोपाची पुष्टी करू नाही, असं म्हणताना ‘सीबीआयनं आरोपपत्र लिहिलंय की कादंबरी?’ असा उद्विग्न प्रश्न उच्च न्यायालयानं विचारलाय.

तपासात सीबीआयचा ढिसाळपणा

भारतीय दंड विधानाच्या कलम ३०३ नुसार (हत्या प्रकरण) गेल्या आठवड्यात दोन आरोपींविरुद्ध सीबीआयननं आरोपपत्र दाखल केलं होतं. मात्र, न्यायमूर्ती डॉ. रवि रंजन आणि न्यायमूर्ती सुजीत नारायण प्रसाद यांच्या खंडपीठानं सीबीआयकडून पूर्ण चौकशी केली नसल्याचं तसंच सीबीआयच्या चौकशीत कोणतेही नवे तथ्य समोर आले नसल्याचं नमूद केलं.

न्यायाधीशांना मागून आलेल्या गाडीनं दिली होती धडक

२८ जुलै २०२१ मध्ये हजारीबागचे रहिवासी आणि जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उत्तम आनंद (४९ वर्ष) यांना एका चोरी करण्यात आलेल्या एका गाडीनं मागून येऊन जोरदार धडक दिली होती. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हा केवळ अपघात नसून हत्येचा कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

CCTV फुटेज : मॉर्निंग वॉकला निघालेल्या न्यायाधीशाला टेम्पोची जाणून बुजून धडक
loya case: काँग्रेसचे दहा सवाल
न्यायालयाची चौकशीवर लक्ष

या प्रकरणाची चौकशीवर देखरेख ठेवण्याविषयी दाखल करण्यात आलेल्या एक जनहित याचिकेवर सुनावणी करताना ‘सीबीआयनं न्यायालयाला अंधारात ठेवत नियमितरित्या आरोपपत्र दाखल केल्याचं’ही सुनावणी दरम्यान म्हटलंय.

सुरुवातीला या प्रकरणाची चौकशीची जबाबदारी झारखंड पोलिसांची विशेष चौकशी समितीकडे सोपवण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीची सूत्रं सीबीआयकडे सोपवली होती. सीबीआयनं ४ ऑगस्टपासून या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी स्वीकारली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: