watch video : अफगाणिस्तानने पाकिस्तानचा जवळ जवळ पराभव केला होता, पण…


शारजाह: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने अफगाणिस्तानचा ५ विकेटनी पराभव केला. स्पर्धेतील पाकिस्तानचा हा सलग तिसरा विजय असून त्यांनी सेमीफायनलमधील स्थान जवळ जवळ पक्के केले आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर १४८ धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची दमछाक झाली. अफगाणिस्तानचा संघ विजयाच्या जवळ आला होता. पण एका षटकामुळे पाकिस्तानने बाजी मारली.

वाचा-दिग्गज खेळाडूकडून झाली मोठी चूक; १ चेंडूवर दिल्या १० धावा

पाकिस्तानला अखेरच्या २ षटकात विजयासाठी २४ धावांची गरज होती. सामना तेव्हा रोमांचक स्थितीत होता. विजय कोणाच्याही पारड्यात गेला असता. मैदानावर आसिफ अली आणि शादाब खान हे खेळाडू होते. अफगाणिस्तानने १९वे षटक करीम जनत याने टाकले. पहिल्याच चेंडूवर आसिफने लॉन्ग ऑफच्या दिशने षटकार मारला. दुसऱ्या चेंडूवर धाव आली नाही. तिसऱ्या चेंडूवर त्याने डीप मिडविकेटच्या दिशेने दुसरा षटकार मारला. चौथ्या चेंडूवर पुन्हा धाव मिळाली नाही. त्यानंतर आसिफने पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर षटकार मारून पाकिस्तानला विजय मिळून दिला. या ६ चेंडूत आसिफने २४ धावा काढल्या. त्याने फक्त ७ चेंडूत २५ धावा केल्या.

वाचा- धावा करता येत नाही म्हणून कर्णधाराने मैदान सोडले; पाहा टी-२० वर्ल्डकपमधील प्रकार


वाचा- ‘या’ खेळाडूला IPLनंतर घरी पाठणार होते बीसीसीआय; तरी खेळतोय टी-२० वर्ल्डकप

अफगाणिस्तानने तिसऱ्या षटकात मोहम्मद रिझवानला बाद करून पाकला पहिला धक्का दिला होता. त्यानंतर बाबर आझम आणि फखर जमा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागिदारी करून पाकला पुन्हा सामन्यात आणले. पण १४८ चे लक्ष्य गाठताना त्यांची दमछाक झाली. या सामन्यात राशिद खानने मोहम्मद हफीजची विकेट घेत आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात वेगाने १०० विकेट घेण्याची कामगिरी केली.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: