हायलाइट्स:
- आर्यन खानची आज होणार सुटका
- जामीन आदेशाची प्रत तुरुंगात जमा
- मन्नतबाहेर रोषणाई
इतर कायदेशीर प्रक्रिया होऊन आर्यनच्या सुटकेचा आदेश या न्यायालयाकडून आर्थर रोड तुरुंगात पोहोचेपर्यंत सुटकेची वेळ निघून गेल्याने आर्यनला शुक्रवारची रात्रही तुरुंगातच काढावी लागली होती. सुटकेच्या आदेशाची प्रत जेलच्या जामीन पेटीत जमा करावी लागणार होती. मात्र, शुक्रवारी संध्याकाळी ५. ३५ पर्यंत वाट पाहण्यात आली, पण तो येऊ शकला नाही. त्यामुळं त्याला शनिवारी सोडण्यात आलं नव्हतं.
वाचाः गुंता वाढला! आता प्रभाकर साईल एनसीबीला सापडेनात
शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास तुरुंग अधिकाऱ्यांनी आर्थर रोड कारागृहाबाहेरील जामीन पेटी उघडली आहे. कालच आर्यन खानच्या जामीन आदेशाची प्रतदेखील पेटीत ठेवण्यात आली होती. सकाळी ९नंतर जामीनाची कार्यवाही सुरू होईल त्यानुसार आज ११ पर्यंत आर्यन खानची सुटका होण्याची शक्यता आहे. तर, आर्यन खानला आणण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड कारागृहाकडे रवाना झाला आहे.