कमिशन व नोकरीच्या अमिषाला भुलला आणि…; कोल्हापुरातील धक्कादायक घटना


कोल्हापूरः नामवंत कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात कमिशन मिळते, पार्ट टाईम जॉबही दिला जातो, अशा भुलथापा दोन महिलांनी मारल्यानंतर मोबाईलवर पाठवलेल्या लिंकवर त्याने सहा लाख रुपये भरले. पण कमिशनही मिळाले नाही आणि नोकरीही मिळाली नाही. नोकरीच्या बहाण्याने कोल्हापुरातील तरुणाला सहा लाख रुपयाचा गंडा बसल्याने त्या तरुणाची अवस्था ‘तेलही गेले, तुप गेले, हाती राहिले धुपाटणे’ अशी झाली आहे. अखेर त्या तरुणाने पोलिस ठाण्यात धाव घेत ऑनलाईन फसवणूकीची फिर्याद दिली आहे.

राजारामपुरी पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे. प्रतिभानगर येथील अभिनव निवास साळोखे या सत्तावीस वर्षीय तरुणाला २२ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संशयीत महिला शानी व गांधी अनैशा (पूर्ण नाव, पत्ता नाही) यांनी मोबाईलवर मेसेज व फोन करून दररोज ८०० ते तीन हजार रुपये कमवा अशी ऑफर दिली होती. आपण एका बड्या कपंनीत अकाउंटट म्हणून काम करतो, असे व्हॉट्सअॅपवर सांगितले होते. फोन व मेसेजद्वारे संभाषण करुन दोघींनी अभिवन यांचा विश्वास संपादन केला होता.

वाचाःआर्यनची थोड्याच वेळात सुटका; शाहरुख खान कारागृहाकडे रवाना

बडया कंपनीत गुंतवणूक केल्यास तुम्हाला भरपूर कमिशन मिळेल, तसेच पार्ट टाईम जॉब मिळेल अशा भुलथापा मारल्या. त्यानंतर या महिलांनी अभिनव यांना एक लिंक पाठवली व ती भरून देण्यास सांगितले. त्यानंतर अभिनव यांनी त्या कंपनीत सहा लाख रुपये गुंतवले. मात्र कोणत्याही प्रकारचा परतावा अथवा कमिशन मिळाले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याने शुक्रवारी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक इश्वर ओमासे पुढील तपास करत आहेत.

वाचाःगुंता वाढला! आता प्रभाकर साईल एनसीबीला सापडेनात



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: