हायलाइट्स:
- राज्यातील साखर कामगारांची दिवाळी गोड.
- दिड लाख कामगारांच्या पगारात १२ टक्के वाढ.
- पगारवाढीबाबत शासन निर्णयही झाला जारी.
वाचा: काशिफ खान अखेर आला समोर; मलिक यांचे ‘ते’ आरोप फेटाळले, म्हणाला…
शासन निर्णयानुसार १ एप्रिल २०१९ रोजी संबंधित कामगारांच्या वेतनश्रेणीत १२ टक्के पगारवाढ म्हणजे अस्तिवात असलेल्या पगाराच्या १२ टक्के वाढ देण्यात येणार आहे. या शिवाय फिटमेंट बेनिफिट देण्यात येणार आहे. तृतीय वेतन मंडळाने सूचविलेली वर्गवारी व वेतनश्रेणी आणि स्थिर भत्ता यापूर्वी स्वीकारण्यात आले आहे. त्यात स्थिर भत्ता पूर्ण रुपयात करून घेतलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम -१९८३ अन्वये घरभाडे भत्ता प्रदान करण्यात येणार आहे. तथापि, जे कामगार व कर्मचारी कारखान्यामार्फत दिलेल्या घरात राहतात, त्याला घरभाडे भत्ता देय नसणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
वाचा: पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर गंभीर आरोप; राजीनाम्याची केली मागणी
रात्रपाळीत (तिसरी पाळी) काम करणाऱ्यांना हजर असलेल्या प्रत्येक रात्रीपाळीसाठी २६ रुपये प्रमाणे रात्रपाळी भत्ता लागू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सर्व कामगारांना ग्रेडप्रमाणे दरमहा धुलाई भत्ता आणि दरमहा ३०८ रुपये वैद्यकीय भत्ता देय करण्यात आला आहे. स्त्री कामगारांना मॅटर्निटी बेनिफिट अधिनियमानुसार रजा देय करण्यात आली असून अनुकंपा धोरण लागू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रजा व पगार सुट्ट्या, गणवेश वाटप, प्रवासभत्ता, वाहनभत्ता, दैनिक भत्ता, ग्रुप ग्रॅच्युईटी विमा योजना, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी, कारखान्याच्या विश्रामगृह सवलती आदी लागू करण्यात आल्या आहेत. या शासन निर्णयाने कामगारांचे हित जपले असून सर्व कामगार आणि कारखान्यामधील कर्मचाऱ्यांमध्ये एक आत्मविश्वासाची भावना निर्माण होणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
वाचा: वानखेडेंवरील खंडणीचा आरोप: NCBला मुंबई पोलिसांकडून हवी ‘ही’ मदत