हायलाइट्स:
- अकोला जिल्हा परिषदेतील दोन्ही सभापतीपदांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला धक्का.
- या निवडणुकीत वंचितचा पराभव करीत महाविकास आघाडीने मारली बाजी.
- महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना भाजपने मतदान केल्याने आघाडीचा विजय सुकर.
जानेवारी २०२० मध्ये जि.प.,पं.स. निवडणुका झाल्या होत्या. मात्र ओबीसी आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. न्यायालयाने ४ मार्च रोजी ओबीसी मागास प्रवर्गाचे आरक्षण २७ टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, असे स्पष्ट केल्याने त्या जागाच रिक्त झाल्या होत्या. त्यामुळे ५ ऑक्टोबर रोजी मतदान झाले आणि ६ ऑक्टोबर रोजी निकालही जाहीर झाला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या सभापतींच्या दोन जागांसाठी शुक्रवारी निवडणुकीची प्रक्रिया पार पडली.
क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज १,३३८ नव्या रुग्णांचे निदान, बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत घट
असे जुळले समीकरण
पोटनिवडणुकीनंतर वंचितचे संख्याबळ २३ इतके झाले. शिवसेना- १३ (एक सदस्या काही दिवसांपूर्वी अपात्र झाली असून, सध्या प्रकरण प्रलंबित आहे), भाजप-५, काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी ४, प्रहार जनशक्ती पक्षाला १ व तीन अपक्ष सदस्य आहेत. त्यांपैकी एक अपक्ष सम्राट डोंगरदिवे यांनी महाविकास आघाडीकडून सभापतीपदाच्या निवडणुकीत उडी घेतली. तर, भाजपने प्रहारला पाठिंबा दिल्याने महिला व बालविकास सभापतीपद स्फूर्ती गावंडे यांच्याकडे आले असून विषय समिती सभापतीपदी सम्राट डोंगरदिवे बिनविरोध निवडून आले.
क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानची आजची रात्र तुरुंगातच; उद्या सकाळी सुटकेची शक्यता
वंचित बहुजन आघाडीच्या योगिता रोकडे व संगिता अढाऊ या दोघींनीही महिला व बाल विकास समिती सभापतीपदासाठी अर्ज भरला. परिणामी विषय समिती सभापतीसाठी डोंगरदिवे एकटेच रिंगणात राहिले. नंतर अढाऊ यांनी अर्ज मागे घेतला आणि रोकडे व प्रहारच्या स्फूर्ती गावंडे यांच्यात लढत झाली.
क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानच्या जामीन आदेशाची प्रत जारी; पाहा, ‘अशा’ आहेत कठोर अटी