Mamata Banerjee in Goa: ‘भाजपकडून कॅरेक्टर सर्टिफिकेटची गरज नाही’, ममता गोव्यात कडाडल्या


हायलाइट्स:

  • तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी गोव्यात
  • ‘राज्यात दिल्लीची दादागिरी चालणार नाही’
  • बंगाल एवढीच गोवा हीदेखील माझी मातृभूमी : ममता बॅनर्जी

पणजी :तृणमूल काँग्रेस अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. गोवेकरांसोबत जाहीर सभेत बोलताना शुक्रवारी ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. राज्यात दिल्लीची दादागिरी चालू देणार नाही, असं म्हणत यावेळी ममतांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली.

‘मी इथे तुमचे हक्क हिरावून घेण्यासाठी आलेले नाही तर तुमची मदत करण्यासाठी आलेय’, असं म्हणत ममता यांनी गोवेकरांना साद घातली.

ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तसंच टेनिस चॅम्पियन लिएन्डर पेस, नफीसा अली आणि मृणालिनी देशप्रभू यांनी आज औपचारिकरित्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दिल्लीची दादागिरी चालणार नाही. संविधानाचा पाया मजबूत राहावा हीच आमची इच्छा आहे. गोव्यात संस्कृती आणि वारसा कायम राहावा यासाठी संपूर्ण सुरक्षा प्रदान करण्याचा तृणमूलची इच्छा आहे. गोवेकरांची मान नेहमी उंचावून, सन्मानानं जगावं ही आमची इच्छा आहे, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी यावेळी म्हटलं.

Narendra Modi: ऐन दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड दौऱ्यावर
prashant kishor : पुढील अनेक दशकं भाजपच सत्तेत राहणार! प्रशांत किशोर यांच्या दाव्यात किती दम? वाचा…

माझ्या धर्माच्या आधारावर भाजपच्या कॅरेक्टर सर्टिफिकेटची मला गरज नाही. भाजपला हा अधिकारही नाही. मी एक अभिमानी हिंदू आहे, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर तीव्र शब्दांत टीका केली.

माझा धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे. माझा एकात्मतेवर विश्वास आहे. भारत ही एकच मातृभूमी… जेवढी पश्चिम बंगाल ही माझी मातृभूमी आहे तेवढीच गोवा हीदेखील माझी मातृभूमी आहे, असं म्हणत ममतांनी एकात्मतेचं आवाहन केलं.

‘पश्चिम बंगालचं उदाहरण समोर ठेवताना, पश्चिम बंगाल हे मजबूत राज्य आहे. भविष्यात गोव्यालाही एक मजबूत राज्य म्हणून पाहण्याची आमची इच्छा आहे. गोव्यात एक नवी सकाळ आम्हाला पाहायचीय. कुणी तरी विचारत होतं की ममताजी गोव्यात काय करणार? का नाही, मी भारतीय आहे… कुठेही जाण्याचा मला अधिकार आहे तसा तो तुम्हालाही आहे’ असं म्हणत एका नव्या गोव्याचं स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांनी केला.

2G Spectrum Scam: बिनशर्त माफी, माजी CAG विनोद राय यांच्या माफीनाम्याचा संजय निरुपम यांच्याकडून स्वीकार
Priyanka Gandhi: रेल्वे प्रवास करत बुंदेलखंडात पोहचल्या प्रियांका गांधी; हमालांशी, मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाशी संवादSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: