जे गेल्या १८ वर्षात झाले नाही ते टीम इंडियाला या रविवारी करावे लागले; नाही तर…


दुबई: टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचे लक्ष आता न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या लढतीवर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० वर्ल्डकपमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी लढत होणार आहे. या दोन्ही संघांनी स्पर्धेतील पहिली लढत गमावली आहे. त्यामुळे ज्या संघाचा या सामन्यात पराभव होईल त्याचे वर्ल्डकपमधील आव्हान जवळ जवळ संपुष्टात येईल.

वाचा- ‘या’ खेळाडूला IPLनंतर घरी पाठणार होते बीसीसीआय; तरी खेळतोय टी-२० वर्ल्डकप

१८ वर्ष झाली विजय मिळाला नाही

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २००७च्या टी-२० वर्ल्डकप पासून ते या वर्षी झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपर्यंत आयसीसी स्पर्धेत एकूण ७ लढती झाल्या आहेत. त्यापैकी ६ लढती न्यूझीलंडने जिंकल्या असून एका लढतीचा निकाल पावसामुळे लागला नाही. टी-२० वर्ल्डकपमध्ये या दोन्ही संघात आतापर्यंत दोन लढती झाल्या आहेत. त्या दोन्ही लढतीत न्यूझलंडने विजय मिळवला आहे. २००७ साली भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकला होता पण न्यूझीलंडने १० धावांनी भारताचा पराभव केला होता. २०१६च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये त्यांनी ४७ धावांनी भारताचा पराभव केला होता.

वाचा- श्रेयस अय्यर सोडणार दिल्ली कॅपिटल्स; समोर आलं मोठं कारण

आयसीसीच्या स्पर्धेत भारताने न्यूझीलंडचा २००३ साली अखेरचा पराभव केला होती. तेव्हा भारताने वनडे वर्ल्डकपमध्ये ७ विकेटनी मॅच जिंकली होती. पण त्यानंतर एकाही मोठ्या स्पर्धेत भारताला न्यूझीलंडचा पराभव करता आलेला नाही. २०१९च्या वनडे वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये त्यांनी भारताचा पराभव केला होता. यामुळे भारताचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले होते. पावसामुळे दोन दिवस झालेल्या या लढतीत विलियमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव केला होता.

वाचा- अफगाणिस्तानच्या खेळाडूंना तालिबानी फर्मान; ‘राष्ट्रगीत सुरू असताना भावनांना आवर घाला’

या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये देखील न्यूझीलंडने भारताचा ८ विकेटनी पराभव करून जेतेपद मिळवले. WTC दरम्यान भारताचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. तेव्हा देखील त्यांनी २-० असा पराभव केला होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० क्रिकेटमध्ये एकूण १६ लढती झाल्या आहेत. त्यापैकी ८ मध्ये न्यूझीलंड तर ६ मध्ये भारताने विजय मिळवलाय. दोन लढती टाय झाल्या आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: