congress targets prashant kishor : काँग्रेस प्रशांत किशोरांवर बरसली, ‘आधी स्वतः काय ते ठरवा… मग भाषणबाजी करा’


नवी दिल्लीः निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या ताज्या वक्तव्यावरुन काँग्रेसने जोरदार निशाणा साधला. ‘कंसल्टेंट’ (सल्लागार) ला कोणतीही विचारधारा नसते आणि इतरांना भाषणं देण्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी स्वतः आधी ठरवावं, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. ‘सल्लागार स्वत:ला जेवढा महत्त्वाचा समजतो, तेवढाच तुम्ही आणि मीही त्याला महत्त्व देऊ लागलो तर हा देश सल्लागार चालवतील’, असं उत्तर काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला दिलं.

देश भाजपमुक्त झाला पाहिजे असं आम्ही कधी म्हटलं आहे का? सल्लागाराला कोणतीही विचारधारा नसते. तुम्ही सल्लागार, तंत्रज्ञ, रणनीतीकार असाल… कधी टेबलच्या या बाजूला, कधी त्या बाजूला… आधी स्वतः ठरवा, तुम्ही काय आहात ते? मग भाषणबाजी करा’, अशी बोचरी टीका पवन खेडा यांनी केली.

भाजप भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहील आणि पुढील अनेक दशकं कायम राहील, असं राजकीय भाकीत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केलं आहे, त्यावर काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी आज उत्तर दिलं.

mamata banerjee : पंतप्रधानपदाच्या शर्यतीवरून ममता म्हणाल्या, ‘आताच सर्वकाही का सांगू’

supreme court : ‘नागरिकांच्या जीवाशी खेळणार नाही… कोवॅक्सिन घेतलेल्यांना कोविशिल्ड देण्याचे निर्देश कसे देणार?’

गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस (टीएमसी) साठी निवडणूक रणनीती तयार करत असलेल्या किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विचारावर टीका केली आहे. जनता मोदींना आणि भाजपला उखडून टाकेल, या भ्रमात राहुल गांधी आहेत. त्यांना कळत नाहीए, असं प्रशांत किशोर म्हणाले. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ गोव्यातील एका खासगी सभेतला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: