कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर गंभीर आरोप; राजीनाम्याची केली मागणी


हायलाइट्स:

  • कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर गंभीर आरोप.
  • पाटील यांनी सत्तेचा गैरवापर करत अठरा लाखाचा मुंद्रांक शुल्क बुडविला- माजी महापौर आणि नगरसेवकाचा आरोप.
  • सरकारचे उत्पन्न बुडविणाऱ्या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- माजी महापौर सुनील कदम व माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांची मागणी.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सत्तेचा गैरवापर करत अठरा लाखाचा मुंद्रांक शुल्क बुडविला आहे. सरकारचे उत्पन्न बुडविणाऱ्या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी महापौर सुनील कदम व माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांनी पत्रकार बैठकीत केली. (Former mayor and corporator made serious allegations against Kolhapur Guardian Minister Satej Patil)

कदम यांनी सांगितले की, कोल्हापुरातील शेतकरी संघाची जागा पुण्यातील काकडे बिल्डरनला २७ कोटी ८७ लाख रूपयेला विकली होती. नंतर तीच जागा पालकमंत्री पाटील यांच्या ज्ञानशांती ऍग्रो फार्म्स लिमिटेड या कंपनीने विकत घेतली.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानची आजची रात्र तुरुंगातच; उद्या सकाळी सुटकेची शक्यता

या जागेच्या खरेदीदारांमधील, सहखरेदीदारांनी आपापसातील वाटणीपत्र करताना सरकारचे १८ लाख २२ हजार रूपयांचं मुद्रांकशुल्क बुडविले आहे. या संदर्भात तक्रार केल्यानंतर मुद्रांक अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली. चौकशीमध्ये पालकमंत्री पाटील यांनी सरकारची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानच्या जामीन आदेशाची प्रत जारी; पाहा, ‘अशा’ आहेत कठोर अटी

पालकमंत्री सतेज पाटील यांनी पदाचा गैरवापर करून, दबाव आणून मुद्रांकशुल्क चुकवले असा आरोप करताना कदम म्हणाले, मुद्रांकशुल्क बुडवल्याप्रकरणी दरमहा २ टक्के याप्रमाणे २०२१ अखेर एकूण ५४ लाख रूपये वसुलीचा आदेश जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांनी काढला आहे. सात दिवसात ही रक्कम भरण्याचेही या आदेशात म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- अनिल देशमुख यांना हायकोर्टाचा मोठा धक्का; याचिका फेटाळलीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: