संकटातही दातृत्व नाही थांबलं; करोना संकट काळात अझीम प्रेमजींचे दररोज २७ कोटींचे दान


हायलाइट्स:

  • अझीम प्रेमजी यांच्यानंतर एचसीएलचे शिव नाडर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
  • नाडर यांनी धर्मादाय कारणांसाठी १,२६३ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
  • मुकेश अंबानी यांनी २०२०-२१ मध्ये धर्मादाय कार्यांसाठी ५७७ कोटी रुपयांचे योगदान दिले.

नवी दिल्ली : आयटी कंपनी विप्रो (Wipro)चे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण ९,७१३ कोटी रुपये म्हणजेच दररोज २७ कोटी रुपये दान केले आहेत. यासह त्यांनी सेवाभावी कार्य करणाऱ्या भारतीयांमध्ये आपले अव्वल स्थान कायम ठेवले. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी ५७७ कोटी देणगीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. करोनासारख्या वैश्विक संकटात देखील या धनाढ्य व्यक्तींचा दातृत्वाचा झरा आटला नाही.

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी तिसऱ्या स्थानी
अझीम प्रेमजी यांच्यानंतर एचसीएलचे शिव नाडर दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांनी धर्मादाय कारणांसाठी १,२६३ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी २०२०-२१ मध्ये धर्मादाय कार्यांसाठी ५७७ कोटी रुपयांचे योगदान दिले. यासह ते देणगीदारांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

खेळखंडोबा! गुंतवणूकदार होरपळल्यानंतर सरकारला आली जाग, IRCTC बाबतचा ‘तो’ निर्णय तूर्त मागे
गौतम अदानी आठव्या क्रमांकावर
एडेलगिव हुरुन इंडिया फिलांथ्रोपी लिस्ट २०२१ नुसार, कुमार मंगलम बिर्ला यांनी ३७७ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. यासह त्यांनी यादीत चौथे स्थान पटकावले आहे. तसेच देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी आपत्ती निवारणासाठी १३० कोटी रुपयांची देणगी दिली. यासह गौतम अदानी देणगीदारांच्या यादीत आठव्या स्थानावर आहेत.

दरवाढीची झळ कायम ; सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत झाली वाढ
देशातील अव्वल दहा दानशूर
दानशूर व्यक्तिंबद्दल बोलायचं झालं, तर हिंदुजा परिवार, बजाज परिवार, अनिल अग्रवाल आणि बर्मन परिवाराचा अव्वल दहा दानशूरांमध्ये समावेश होतो. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात नंदन निलेकणी यांनी १८३ कोटी रुपयांची देणगी दिली. यासह इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांनी यादीत पाचवे स्थान पटकावले आहे.

खूशखबर ; ‘पीएफ’वरील व्याजाला अर्थमंत्रालयाने दिली मंजुरी, यंदा मिळणार इतकं व्याजSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: