धक्कादायक! पत्नीचा खून केल्यानंतर पतीची आत्महत्या


हायलाइट्स:

  • पहाटे झोपेत असलेल्या पत्नीचा पतीने गळा आवळून केला खून.
  • त्यानंतर पतीने गावातील माजी सरपंचाच्या शेतात पळसाच्या झाडाला गळफास घेत केली आत्महत्या.
  • जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेल्या सावखेडा बुद्रूक येथील घटना.

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेल्या सावखेडा बुद्रूक येथे आज पहाटे झोपेत असलेल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीने गावातील माजी सरपंचाच्या शेतात पळसाच्या झाडाला गळफास घेत जिवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी समोर आली आहे. गायत्री परदेशी (वय ३२) असे मृत पत्नीचे नाव आहे. पती सतिष धनसिंग परदेशी (वय ३८) याने तीचा खून करुन आत्महत्या केली. (husband commits suicide after putting and end of the life of his wife)

पाचोरा तालुक्याती सावखेडा बुद्रूक येथे परदेशी दाम्पत्य सहा वर्षाचा मुलगा व चार वर्षाच्या मुलीसह राहत होते. काल गुरुवारी रात्री संपूर्ण कुटुंब झोपी गेल्यानंतर शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास सतिष परदेशी याने गाढ झोपेत असलेली पत्नी गायत्री हीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तो घराबाहेर आरडाओरड करून पळत असतानांच शेजारी राहणारा लहान भाऊ संदिप परदेशी यांच्या लक्षात आल्यानंतर त्याने सतिषला पकडून, तू एवढ्या रात्री कुठे जात आहेस व आरडाओरड का करीत आहेस? अशी विचारणा केली त्यावर सतिषने सांगितले की, तू मला का अडवतो, मी पत्नी गायत्रीचा गळा दाबून खून केला आहे. संदिपने घरात जाऊन बघितले तेंव्हा गायत्री मृत अवस्थेत तर दोघे मुले झोपलेले दिसले.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानची आजची रात्र तुरुंगातच; उद्या सकाळी सुटकेची शक्यता

संशयित पतीने घेतला गळफास

त्याचवेळी भाऊ संदीपच्या हातातून निसटून गेलेल्या सतिष परदेशी याने गावाबाहेर जाऊन माजी सरपंच गोकुळसिंग परदेशी यांच्या शेतात पळसाच्या झाडावर चढत अंगातल्या स्वेटर व नाईट पँटचे दोन तुकडे करून गळ्याभोवती गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही वार्ता गावभर पसरल्यानंतर सतिष याचा शोध सुरू झाला. गावातीलच संजय सोनवणे सकाळी शेतात जात असतांना त्यांना पळसाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सतिषचा मृतदेह आढळून आल्याने त्याने गावात घटनेची माहिती दिली.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानच्या जामीन आदेशाची प्रत जारी; पाहा, ‘अशा’ आहेत कठोर अटी

पोलिसांनी पत्नीस ठार करून गळफास घेणारा सतिष हा वेडसर असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. मयत पती व पत्नी यांचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. पिंपळगाव (हरे.) पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा व आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.

क्लिक करा आणि वाचा- अनिल देशमुख यांना हायकोर्टाचा मोठा धक्का; याचिका फेटाळली

नुकतेच झाले होते वडिलांचे निधन

सतिष परदेशी व संदिप परदेशी यांचे वडील धनसिंग परदेशी यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. शुक्रवारीच सावखेडा येथून त्यांच्या अस्थी नासिक येथे नेण्यात येणार होत्या. दुसऱ्या दिवशी अस्थी विसर्जन असल्याने सतिष व त्याचे कुटुंब लवकर उठून तयारी करण्यासाठी रोजच्या वेळेपेक्षा लवकर झोपले होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: