धावा करता येत नाही म्हणून कर्णधाराने मैदान सोडले; पाहा टी-२० वर्ल्डकपमधील प्रकार


शारजाह: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये विद्यमान विजेते वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील लढत सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडिजने २० षटकात ७ बाद १४७ धावा केल्या. या सामन्यात अशी एक घटना घडली ज्याने सर्वांना धक्का बसला. वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने फलंदाजी करत असताना चक्क मैदान सोडले.

वाचा-जे गेल्या १८ वर्षात झाले नाही ते टीम इंडियाला या रविवारी करावे लागले; नाही तर…

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गतविजेत्या वेस्ट इंडिजची सुरुवात फार समाधानकारक झाली नाही. १३ षटकात त्यांना ४ बाद फक्त ६२ धावा करता आल्या होत्या. १३व्या षटकात तस्कीन अहमदच्या एका चेंडूवर धाव घेतल्यानंतर कर्णधार कायरन पोलार्ड नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेला गेला. पण तेथून तो थेट पॅव्हेलियनमध्ये गेला. त्याने स्वत:ला रिटायर्ड हर्ट घोषित केले. विशेष म्हणजे पोलार्ड मैदानावर फिट दिसत होता. त्याच्या या निर्णयाने चाहत्यांना आणि समालोचकांना देखील प्रश्न पडला की पोलार्डने असा निर्णय का घेतला?

वाचा-‘या’ खेळाडूला IPLनंतर घरी पाठणार होते बीसीसीआय; तरी खेळतोय टी-२० वर्ल्डकप

पोलार्ड जेव्हा मैदान सोडून जात होता तेव्हा त्याने १६ चेंडूत फक्त ८ धावा केल्या होत्या. त्याला धावा करता येत नव्हत्या. त्यामुळे पोलार्डने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. जेव्हा अखेरच्या षटकात ड्वेन ब्रावो बाद झाला तेव्हा पोलार्ड पुन्हा एकदा मैदानावर आला. त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला. पोलार्डने १८ चेंडूत नाबाद १४ धावा केल्या.

गेल्या म्हणजेच २०१६च्या टी-२० वर्ल्डकपचे विजेते असलेल्या वेस्ट इंडिजने या वेळी ग्रुप फेरीतील पहिल्या दोन्ही लढती गमावल्या आहेत. तर बांगलादेशने देखील दोन्ही लढती गमावल्या आहेत. ही लढत जो संघ गमावेल त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: