पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी राशिद खानला वाटतेय ‘भीती’; दुबईचे स्टेडियम धोक्यात


दुबई : टी-२० विश्वचषकातील २४ व्या सामन्याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचा नजरा लागल्या आहेत, कारण मैदानावर दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे एकमेकांचे शेजारी असणारे संघ भिडणार आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या चाहत्यांचा उत्साह हेच लेगस्पिनर राशिद खानच्या चिंतेचे कारण बनले आहे. राशिद खानने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी चाहत्यांना खास आवाहन केले आहे.

वाचा-‘या’ खेळाडूला IPLनंतर घरी पाठणार होते बीसीसीआय; तरी खेळतोय टी-२० वर्ल्डकप

राशिद खान म्हणाला की, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याचा निकाल काहीही असो, चाहत्यांनी कृपया शांतता राखावी. पाकिस्तानविरुद्ध नेहमीच एक चांगला सामना होतो, पण या सामन्याला खेळाच्या नजरेतून पाहिले पाहिजे. मी सर्व चाहत्यांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. प्रत्येकाने सामन्याचा आनंद घ्यावा, अशी माझी इच्छा आहे. २०१९ च्या विश्वचषक सामन्यानंतर जे घडले ते आता घडू नये.

वाचा- हार्दिक पंड्या न्यूझीलंडविरुद्ध खेळणार की नाही? आज फिटनेस टेस्टनंतर होणार शिक्कामोर्तब

विश्वचषकाच्या सामन्यानंतर पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या चाहत्यांचा राडा
२०१९ च्या वर्ल्ड कप दरम्यान पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे समर्थक एकमेकांशी भिडले होते. लीड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानला रोमहर्षक लढतीत पराभूत केले. यानंतर दोन्ही देशांचे चाहते एकमेकांशी भिडले होते. दोन्ही संघांच्या चाहत्यांनी स्टेडियमच्या मालमत्तेचेही नुकसान केले होते. यानंतर आयसीसीने गोंधळ घालणाऱ्या चाहत्यांना पुढील सामन्यांसाठी बंदी घातली. एका अफगाण चाहत्याने पाकिस्तानी चाहत्याला धक्का दिल्यानंतर ही मारामारी सुरू झाली आणि नंतर हे प्रकरण खूप वाढले होते. आताही तसेच काही घडू नये, याची भीती राशिद खानला वाटत असून त्याने चाहत्यांना शांततेचे आवाहन केले आहे.

वाचा- जे गेल्या १८ वर्षात झाले नाही ते टीम इंडियाला या रविवारी करावे लागले; नाही तर…

दोन्ही संघांना यूएईतील खेळपट्ट्यांचा अनुभव
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांना यूएईच्या खेळपट्ट्यांचा खूप अनुभव आहे. या दोन्ही देशांनी आपले बहुतांश क्रिकेट येथे खेळले आहे. अफगाणिस्तानने यूएईमध्ये ३४ पैकी २७ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानने ३८ पैकी २४ जिंकले आहेत. अशा स्थितीत या दोन संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होऊ शकते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: