दिवाळीपूर्वी सोने झाले स्वस्त ; जाणून घ्या आज किती रुपयांची झाली घसरण


हायलाइट्स:

  • आज शुक्रवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव १०० रुपयांनी कमी झाला.
  • सलग तिसऱ्या सत्रात वधारलेले सोने आज ४८ हजारांखाली घसरले.
  • आज एक किलो चांदीचा भाव ६४७९९ रुपये असून त्यात १३२ रुपयांची घसरण झाली आहे.

मुंबई : दिवाळीपूर्वी कमॉडिटी बाजारात नफावसुली दिसून आली आहे. आज शुक्रवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ११५ रुपयांनी कमी झाला. सलग तिसऱ्या सत्रात वधारलेले सोने ४८ हजारांखाली घसरले. चांदीमध्ये देखील ३०० रुपयांची घसरण झाली होती.

सेबीचा मोठा निर्णय; म्युच्युअल फंडात ट्रेडिंग करण्यास ‘या’ व्यक्तींना ‘नो एन्ट्री’
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७८७४ रुपये इतका आहे. त्यात ८७ रुपयांची घट झाली आहे. तत्पूर्वी सोने ४७७६० रुपयांपर्यंत घसरले होते. आज एक किलो चांदीचा भाव ६४७९९ रुपये असून त्यात १३२ रुपयांची घसरण झाली आहे.

सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात घसरण कायम आहे. Goodreturns या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७०५० रुपयांवर आणि २४ कॅरेटचा भाव ४८०५० रुपयांवर स्थिर आहे. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७००० रुपये झाला. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५१२७० रुपये इतका झाला. त्यात गुरुवारच्या तुलनेत ११० रुपयांची घसरण झाली. गुरुवारी सोन २२० रुपयांनी स्वस्त झाले होते.

NPS खाते सुरु करताय; जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी, काय आहे तज्ज्ञांचा सल्ला,
आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५१२० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९२२० रुपये इतका झाला आहे. त्यात गुरुवारच्या तुलनेत १३० रुपयांची घट झाली. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७३५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५००५० रुपये इतका आहे.

संकटातही दातृत्व नाही थांबलं; करोना संकट काळात अझीम प्रेमजींचे दररोज २७ कोटींचे दान
वाढत्या महागाईपासून बचाव करण्यासाठी सोन्यात गुंतवणूक केली जाते. सणासुदीचा काळ पाहता नजीकच्या काळात सोन्यातील तेजी कायम राहील, असे मत शेअर इंडियाचे उपाध्यक्ष रवी सिंग यांनी व्यक्त केले. आज सराफा बाजारात सोन्याचा भाव ४८०६५ रुपये होता तर चांदीचा भाव एक किलोसाठी ६४६९९ रुपये होता.

जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव १७९७.८२ डॉलर प्रती औंस आहे.चांदीचा भाव ०.३ टक्क्यांनी घसरला असून तो २४.०२ डॉलर आहे. चालू आठवड्यात सोने ०.३ टक्क्यांनी वधारले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: