बॅलन डी’ओर विजेत्याचं नाव झालं लिक; मेस्सी-रोनाल्डोला मागे टाकत ‘या’ खेळाडूने मारली बाजी


नवी दिल्ली : गेल्या वर्षी कोरोनामुळे बॅलन डी’ओर पुरस्कार रद्द करण्यात आला होता. त्यामुळे यंदा कोणता फुटबॉल स्टार हा पुरस्कार पटकावणार याची चर्चा जोरदार सुरू आहे. शुक्रवारी (२८ ऑक्टोबर) फ्रान्समधील एका फुटबॉल मासिकाने यंदाच्या बॅलन डी’ओर पुरस्काराच्या शर्यतीतील ३० फुटबॉलपटूंची नावे जाहीर केली. लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो व्यतिरिक्त कायलिन एम्बाप्पे, नेमार, करीम बेंझेमा, जोर्झिन्हो आणि एन गोलो कांते यांसारख्या अनेक प्रसिद्ध खेळाडूंची नावे यावर्षी या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूसाठी २० नावांची घोषणा करण्यात आली.

बॅलोन डी’ओर पुरस्कार वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूला दिला जातो. जगभरातील पत्रकार आणि चाहते या पुरस्कारासाठी त्यांच्या आवडत्या खेळाडूला मतदान करतात. या आधारावर विजेत्याची निवड केली जाते. हा पुरस्कार १९५६ पासून दरवर्षी जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूला दिला जात आहे.

वाचा-‘या’ खेळाडूला IPLनंतर घरी पाठणार होते बीसीसीआय; तरी खेळतोय टी-२० वर्ल्डकप

रॉबर्ट आहे आघाडीवर

बायर्न म्युनिकचा रॉबर्ट लेवांडोव्स्की यंदाच्या पुरस्कारासाठी प्रबळ दावेदार आहे. लीक झालेल्या वृत्तानुसार, तो सध्या मतदानात आघाडीवर आहे. या यादीत पीएसजीचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी दुसऱ्या, तर फ्रेंच स्ट्रायकर करीम बेन्झेमा तिसऱ्या स्थानावर आहे. रॉबर्टने यंदा गोल्डन बॉल पुरस्कारही जिंकला आहे. त्याला हा पुरस्कार मिळाल्यास हा पुरस्कार पटकावणारा तो लुका मॉड्रिचनंतरचा दुसरा खेळाडू ठरेल. लुका मॉड्रिचनंतर गेल्या 10 वर्षांपासून या पुरस्कारावर रोनाल्डो आणि मॉड्रिचचा दबदबा आहे.

वाचा-अफगाणिस्तानच्या खेळाडूंना तालिबानी फर्मान; ‘राष्ट्रगीत सुरू असताना भावनांना आवर घाला’

मेस्सीच्या आशा मावळणार

जर रॉबर्टला बॅलन डी’ओर हा पुरस्कार मिळाला, तर लिओनेल मेस्सीसाठी हा मोठा धक्का असेल. मेस्सीने यावर्षी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्रॉफी जिंकली आहे. मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटिनाने यंदा कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. मेस्सीने अलीकडेच त्याचा बालपणीचा क्लब बार्सिलोना सोडून पीएसजी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे पोर्तुगालचा स्टार खेळाडू रोनाल्डो सध्या शर्यतीत खूपच मागे आहे, तो सध्या नवव्या स्थानावर आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: