‘क्रांती रेडकर यांना बाळासाहेबांची आठवण येणं साहजिक आहे, कारण…’


हायलाइट्स:

  • चंद्रकांत पाटील यांची सोलापुरात तुफान फटकेबाजी
  • क्रांती रेडकर हिनं मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर दिली प्रतिक्रिया
  • शिवसेनेवर बोचऱ्या शब्दांत केली टीका

सोलापूर: समीर वानखेडे (Sameer Wankhede) व त्यांच्या कुटुंबावर होत असलेल्या आरोपांमुळं त्रस्त होऊन समीर यांची पत्नी, अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात तिनं शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली आहे. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेवर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.

क्रांती रेडकर हिनं मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात बाळासाहेबांचा उल्लेख केला आहे. ‘बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढलेय. अन्याय करू नये आणि अन्याय सहन करू नये हे त्यांच्याकडून शिकले. त्याच बळावर आज मी लढतेय. रोजच्या रोज आमच्या अब्रूची लख्तरं चारचौघांत उधळली जातायत. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या प्रतिष्ठेचा खेळ करून ठेवलाय. आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं,’ असं सांगून, आपण योग्य तो न्याय करावा, अशी विनंती तिनं मुख्यमंत्र्यांकडं केली आहे.

वाचा: ‘काँग्रेसचे नेते दरोडेखोर नसतात, ते परवडले; पण राष्ट्रवादीचा भरवसा नाही’

क्रांती रेडकर हिच्या या पत्राबाबत विचारलं असता चंद्रकात पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ‘आज पदोपदी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते. ते म्हणायचे खोटे बोलू नका. मात्र, हे सरकार प्रत्येक ठिकाणी खोटं बोलतंय. त्यामुळं क्रांती रेडकर असतील किंवा मी, आम्हाला बाळासाहेबांची आठवण येणं साहजिकच आहे,’ असं पाटील म्हणाले.

क्रांती रेडकरनं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र
हे सोमय्या आणि भाजपचे यश

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे भाजपचे पोपट असल्याची टीका केली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आधी म्हणाले, वाझे भाजपचे पोपट आहेत. नंतर हायकोर्टाबद्दलही तसंच म्हणतील. कारण, हायकोर्टानं जामीन लवकर दिला नाही. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी लिहिलेली घटना राज्य सरकारला मान्य नाही. त्यामुळं त्यांनी आरोप करत राहावेत, असं ते म्हणाले.

वाचा: होय! मी भंगारवाला आहे, पण…; नवाब मलिक यांचं भाजपला सडेतोड उत्तरSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: