… त्याच्या मागे कोर्ट-कचेऱ्या लागणार; छगन भुजबळांचा रोख कोणाकडे?


मुंबईः आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. समीर वानखेडे यांच्या बाजूने आता त्यांच्या पत्नी क्रांती रेडकरदेखील मैदानात उतरली आहे. तर, नवाब मलिक यांचे समीर वानखेडेंवर आरोपसत्र सुरूच आहेत. आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, छगन भुजबळ यांनी एक सूचक इशारादेखील दिला आहे.

नवाब मलिक हे सातत्याने समीर वानखेडेंवर आरोप करत आहेत. याबाबत प्रश्न विचारला असता मलिकांच्या मागे पक्ष खंबीरपणे उभा आहे, असं उत्तर दिलं आहे. शिवाय, ‘महाराष्ट्र बॉलिवूडच्या बाबतीत प्रसिद्ध आहेत. संपूर्ण बॉलिवूडला बदनाम करण्याचे काम काही लोकांनी सुरु केलं आहे. त्यांना चांगल्याप्रकारे प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजप सरकारच्या संदर्भात जनतेच्या मनात राग निर्माण होणे. मुंद्रा बंदरावर ३० हजार कोटींचे अमली पदार्थ सापडले आहे त्याची चौकशी झाली का? ३० हजार कोटींचा अमली पदार्थांचा फोकस हटवून महाराष्ट्रावर केला आहे,’ असा आरोप यावेळी छगन भुजबळ यांनी केला आहे.

तसंच, ‘आर्यन खानला आता जामीन मिळाला आहे आणि ज्याने आर्यन खानला पकडलं तो आता कायद्याविरुद्ध जे काही काम झालं त्यावर मार्ग काढण्यासाठी फिरतोय. कोर्ट कचेऱ्या आता त्याच्या मागे लागतील,’ असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.

आता कायदाच काय ते बोलेल; नवाब मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर भाजपनं आता शेतकऱ्यांकडे लक्ष द्याल का?, अशी टीका केली होती. ‘भाजपच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष झालेलं नाही. आता नुकसान झालं तेव्हा दहा हाजारांची मदत जाहीर झाली. त्याप्रमाणे वाटपही व्हायला लागलं आहे. भाजपच्या तपास यंत्रणा जिथे भाजपविरोधी सरकारे आहेत तिथे अतिरेक करत आहेत. चुकीचे अधिकारी चुकीचे काम करत आहेत व जनतेला त्रास देत आहेत,’ असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

वाचाः धक्कादायक! एसटी बसमध्येच गळफास घेऊन चालकाची आत्महत्या

समीर वानखेडे प्रकरणात आता धार्मिक वळण घेतलं आहे. यावर उत्तर देताना ते म्हणाले, ‘इथे हिंदु मुस्लीमचा काही संबंध नाही. भाजप चुकीच्या पद्धतीने तपास यंत्रणांचा वापर करत आहेत. ते सर्व नवाब मलिक उघडकीस आणत आहेत.’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: