हायलाइट्स:
- देशभरात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी ३५ पैशांनी महागले.
- क्रूडचा भाव ८५ डॉलरवर गेल्यानंतर इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे.
- नजीकच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.
मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात प्रचंड वाढ झाली आहे. देशांतर्गत इंधन दर जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीशी संलग्न आहेत. त्यामुळे कंपन्यांकडून दररोज किरकोळ इंधन दर निश्चित करावा लागतो.
सराफा बाजारात तेजी; दिवाळीपूर्वीच सोन्याला तेजीची झळाळी,आज पुन्हा महागले सोने
आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११४.४७ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०८.६४ रुपये इतके वाढले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०५.४३ रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०९.१२ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११७.३५ रुपये असून बंगळुरात पेट्रोल ११२.४३ रुपये झाले आहे.
‘पेटीएम’कडून जम्बो IPO ची घोषणा ; जाणून घ्या संपूर्ण योजनेचा तपशील
मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव १०५.४९ रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत डिझेल ९७.३७ रुपये इतके वाढले आहे. चेन्नईत १०१.५९ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव १००.४९ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १०६.७६ रुपये असून बंगळुरात डिझेल १०३.३५ रुपये आहे.
मित्र-मैत्रिणींची दिवाळी करा खास; FD पेक्षा जास्त परतावा देणारा फंड करा गिफ्ट
दरम्यान, आज जागतिक कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ८४.३२ डॉलर प्रती बॅरल आहे. यूएस डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव २.४ टक्क्याच्या घसरणीसह ८२.६६ डॉलर प्रती बॅरल इतका झाला.उत्पादन कमी असल्याने कच्च्या तेलाचा भाव ८६ डॉलर पुढे गेला आहे. २०१४ नंतर तेलाचा हा सर्वाधिक दर आहे.