Prabhakar Sail वानखेडेंवरील खंडणीचा आरोप: पोलीस प्रभाकरसह ‘त्या’ स्पॉटवर पोहचले आणि…


हायलाइट्स:

  • वानखेडेंवरील खंडणीच्या आरोपांची चौकशी सुरू.
  • प्रभाकर साईलचा जबाब नोंदवल्यावर तपासाला वेग.
  • जबाबात उल्लेख झालेल्या ठिकाणांवर जाऊन तपास.

मुंबई: क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने केलेल्या आरोपांनी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला सोडण्यासाठी २५ कोटींची मागणी करण्यात आली होती, असा दावा प्रभाकर याने केला असून त्याचा तपास आता मुंबई पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी मंगळवारी प्रभाकर याचा जबाब नोंदवला होता. त्यानंतर बुधवारी रात्री तपासाची पुढची पावले पोलिसांनी टाकली. ( Sameer Wankhede Mumbai Police Probe Updates )

वाचा: समीर वानखेडे यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; अटक करायची असल्यास…

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईजवळ समुद्रात कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकून ड्रग्ज पार्टी उधळली होती. एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खान याला २५ दिवसानंतर आज जामीन मिळाला आहे. त्याचवेळी या प्रकरणातील पंच साक्षीदार प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांवरील तपासाबाबत महत्त्वाची माहिती हाती आली आहे.

वाचा: मोठी बातमी: आर्यन खानला अखेर जामीन; आज सुटका नाही, कारण…

प्रभाकर साईल याने एक प्रतिज्ञापत्र सादर करून समीर वानखेडे यांचे नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. आर्यनला सोडण्यासाठी २५ कोटींची मागणी करण्यात आली. हे डील १८ कोटीला डन केले जाणार होते. त्यातील ८ कोटी रुपये वानखेडे यांना दिले जाणार होते. याबाबत किरण गोसावी आणि सॅम डिसुझा या दोघांमध्ये झालेलं संभाषण मी ऐकलं आहे, असा साईल याचा दावा आहे. या आरोपांची एकीकडे एनसीबीकडून चौकशी सुरू असताना मुंबई पोलिसांनी यात एंट्री घेत तपास सुरू केला आहे. मंगळवारी पोलिसांनी प्रभाकरचा जबाब नोंदवून घेतला. झोन वनच्या उपायुक्त कार्यालयात सायंकाळी सात वाजता प्रभाकर गेला होता. त्यानंतर तब्बल ८ तास त्याच्याकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेत पोलिसांनी जबाब नोंदवला. याप्रकरणात साईलचा जबाब तसेच अन्य सर्व तक्रारींचा एकत्रित तपास करण्यासाठी कालच एक तपास पथक नेमण्यात आले आहे. त्याचवेळी बुधवारी रात्री प्रभाकरला जबाबात उल्लेख झालेल्या ठिकाणांवर नेण्यात आले. किरण गोसावी याच्या सांगण्यावरून मी ५० लाख रुपये कलेक्ट केल्याचे प्रभाकरचे म्हणणे होते. त्यात त्याने ताडदेव, वाशी या ठिकाणांचा उल्लेख केला आहे. याशिवाय आणखीही काही लोकेशन्स त्याच्या जबाबात आली असून त्या सर्व ठिकाणी प्रभाकरला नेण्यात आले, असे मुंबई पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे.

वाचा: कोर्टात नेमकं काय घडलं?; आर्यनसाठी रोहतगी युक्तिवाद करत असतानाच…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: