कल्याणराव काळे यांनी महाभंयकर घोटाळा तर केलाच परंतु महाविश्वासघात देखील केला – अँड दीपक पवार

कल्याणराव काळे यांनी महाभंयकर घोटाळा तर केलाच परंतु महाविश्वासघात देखील केला – राष्ट्रवादी काँग्रेसचे अँड दीपक पवार
पंढरपूर, 28/10/2021- कल्याणराव काळे व संचालक व आजवरचे चेअरमन/कार्यकारी संचालक यांनी हजारो लोकांची फसवणूक केली आहे.सन २०१० ते २०१५ मध्ये सहकार शिरोमणीस ऊस घातलेले शेतकरी,कामगार, ट्रॅक्टर मालक,व्यापारी,शिक्षण संस्थेतील कर्मचारी यांच्याकडून पदाचा गैरवापर करून शेअर्स देतो म्हणून लोकांकडून साधारण ३५ कोटी घेतले. त्यांना संस्था उभारणी होइपर्यंत ९% व्याज व सुरू झाल्यानंतर नफा देण्याचे कबूल केले परंतु प्रत्यक्ष आजपर्यंत एक रुपया देखील दिला नाही. कोणालाही विश्वासात न घेता त्यांनी यावर्षी धनश्री परिवाराचे काळुंगे यांना सिताराम कारखाना विकला, किमान आतातरी लोकांचे पैसे परत दिले पाहिजेत. वार्षिक १५% व्याजाने गुंतवणूक दारांना पैसे द्यावेत असा कंपनी कायदा आहे. त्यानुसार रक्कम मिळाली पाहिजे यासाठी काळुंगेना विचारले असता ते काळेकंडे बोट दाखवतात. कायदेशीर तक्रार करण्यासाठी खोलात गेलो असता एक मोठा घोटाळा व फसवणूक उघड झाली आहे असा राष्ट्रवादीचे अँड दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला. 

शेअर्स पोटी जवळपास १५ हजार लोकांकडून ३५ कोटी रुपये घेतले आहेत. ऊस उत्पादक शेतकरी,ट्रक्टर मालक ,कामगार,व्यापारी, शिक्षण संस्थेचे कर्मचारी व इतरांकडून रक्कमा घेतलेल्या आहेत काहींना पावत्या दिल्या आहेत तर काहींना पावती देखील दिलेली नाही. घोटाळा असा केला आहे की त्यापैकी कोणालाच सिताराम कारखान्याचे सभासद केलेले नाही.                                       सिताराम कारखान्याने ROC पुणे यांचेकडे २०१७ साली जी यादी दिलेली आहे तो मुख्य पुरावा आहे . यामध्ये ज्यांच्याकडे पावत्या आहेत अशा लोकांची नावेच सभासद यादीत नाहीत.                                       ४९५२ सभासद दाखविले आहेत परंतु ४९५२ पैकी वाडीकुरोली -१७०५,पिराचीकुरोली -२२३१, धोंडेवाडी - ९०१ एकूण - ४८३७ 
  ३/४ तालुक्यातून पैसे गोळा केलेत व केवळ ३ गावातील लोकांची नावे यादीत आहेत. कल्याणराव काळे यांनी हा महाभंयकर घोटाळा तर केला आहेच परंतु महाविश्वासघात देखील केलेला आहे. 

 कारखाना रेकॉर्डप्रमाने शेअर्स यादीत जे लोक आहेत त्यांचे पैसे खरोखर घेतलेले आहेत की नाही हे तपासात निष्पन्न होईल. पावत्याधारकांचे ३५ कोटी व कारखाना रेकॉर्डप्रमाणे २४ कोटी असे साधारण ६० कोटी रुपये कल्याणराव काळे १० वर्षापासून स्व:स्वार्थासाठी वापरत आहेत. या संदर्भात मी स्वत: काळे व काळुंगे यांच्याशी चर्चा केली परंतु त्यांनी पैसे परत करण्यासाठी ठोस भूमिका घेतली नाही.                                                      तक्रार करण्यापेक्षा लोकांना पैसे परत मिळणे अधिक महत्वाचे आहे व एकाच पक्षात राहून वाद करण्यापेक्षा त्यांनी तोडगा काढणे अपेक्षित होते परंतु त्यांनी टाळाटाळ केली म्हणून मला सर्वत्र तक्रार करावी लागली.

मी दिनांक १८ व २० रोजी मुंबई येथे समक्ष जाऊन ED, SEBI, RD(कंपनी), Income Tax पुणे, ROC पुणे यांचेकडे तक्रार दाखल केली आहे तसेच ४२० खाली DYSP व SP कडे देखील तक्रार केली आहे.शेतकर्‍यांना त्यांचे पैसे व्याजासह परत मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शेतकर्‍यांनी दबावाला बळी न पडता समोर यावे व माझ्याशी संपर्क साधावा. मागील आठवड्यात कल्याणराव काळे यांचे कर्मचारी पावतीधारकांकडे जाऊन सह्या घेत होते व पॅन कार्ड, आधार कार्ड जमा करत होते तरी शेतकर्‍यांनी त्यांना सहकार्य करू नये. खोटी कागदपत्रे तयार करण्याचा बेत हाणून पाडावा. शेतकर्‍यांना आवाहन आहे की त्यांचे कार्यकर्ते तुम्हाला खोटी आश्वासने देतील व कल्याणराव काळे पैसे परत देणारच आहेत तक्रार करू नका म्हणून सांगतील अशांना अजिबात थारा देऊ नका. यापूर्वी चंद्रभागा डेअरीसाठी असेच पैसे घेतले व नंतर डेअरी प्रायवेट केली त्यावेळी देखील पैसे परत देतो असेच सांगत होते परंतु एक रुपया देखील कोणालाच परत मिळाला नाही.

 कल्याणराव काळे यांनी स्व:ताच्या स्वार्थासाठी शेकडो कार्यकर्त्याच्या जमिनीवर , ट्रॅक्टरवर बोजे चढविले आत्ता शिक्षण संस्थेतील शिक्षकांच्या नावावर १० कोटी रुपये काढले आहेत यासर्वांचे Cibil खराब झाले म्हणून त्यांना त्यांच्या प्रपंच्यासाठी कर्ज घेता येत नाही.एकूणच कल्याणराव काळे या एका व्यक्तीने स्वत:चा प्रपंच व स्वार्थ साधण्यासाठी हजारो लोकांचा प्रपंच मातीत घातला आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी काम करणार्‍या सर्व संघटना, कार्यकर्ते व नेते यांनीदेखील याबद्दल आवाज उठवावा असे आवाहन करतो.शेतकरी,कामगार,व्यापारी,ट्रॅक्टर मालकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अँड दीपक पवार यांनी आवाहन केले आहे की तुमच्याकडे असणार्‍या सिताराम कारखान्याच्या पावत्यांची झेरॉक्स कॉपी माझ्या कार्यालयात आणून द्यावी किंवा पावतीवर आपला मोबाईल नंबर टाकून मला ९६०४०१११११ या नंबर वर Whatssapp करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अँड दीपक पवार यांनी केले आहे.                                                                                                                                                   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: