‘त्या’ पंटरला लाच मागताना रंगेहात पकडण्यासाठी रचला सापळा, पण …


हायलाइट्स:

  • वाहन हस्तांतरणासाठी अधिकृत फी भरल्यानंतरही पंटरने मागितली लाच
  • लाच मागणाऱ्या पंटरविरुद्ध गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
  • या पंटरला रंगेहात अटक करण्यासाठी ट्रॅप लावण्यात आला, मात्र पंटर बेपत्ता.

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

वाहन हस्तांतरणासाठी अधिकृत फी भरल्यानंतरही २०० रुपयांची लाच मागणाऱ्या पंटरविरुद्ध गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या पंटरला रंगेहात अटक करण्यासाठी ट्रॅप लावून देखील तो बेपत्ता झाल्याने लाच मागितल्याच्या रेकॉर्डींगवरुन ही कारवाई करण्यात आली. (a case has been registered against the person who demanded bribe even after paying the fee for transferring the vehicle)

भुसावळ येथिल प्रशांत जगन्नाथ भोळे उर्फ पप्पु भोळे (रा. भुसावळ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोळे हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांचा पंटर असल्याचे तक्रारदार वाहन प्रतिनिधी गणेश कौतीकराव ढेंगे (वय ५९, रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी) यांनी फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी गणेश ढेंगे हे ६ ऑक्टोबर रोजी जितेंद्र सोनार यांची दुचाकी (एमएच १९ सीसी ७७००) हस्तांतरणासाठी आरटीओ कार्यालयात गेले होते. त्यांनी शासकीय शुल्क ४०० रुपये भरले. यानंतर भोळे याने आणखी ३०० रुपये लागतील असे सांगीतले. हे ३०० रुपये अधिकाऱ्यांच्या सह्यांपोटी लागतील असे सांगीतले होते.

क्लिक करा आणि वाचा- ड्रग्ज पार्टीत दिसणारा तो ‘दाढीवाला’ नेमका कोण?; नवाब मलिक यांच्या दाव्यातील सत्य काय आहे?

ढेंगे यांनी याबाबत ८ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे जाऊन लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार केली. त्यानुसार ११ रोजी भोळेला रंगेहात अटक करण्यासाठी ११ रोजी पथक जळगावात पोहोचले. यावेळी त्यांनी भोळे याला गाठुन पैशांबाबत बोलणी केली. ‘अॅक्चुली खरी गोष्ट सांगा, भाऊसाहेबांचे किती असे सांगा’ अशी विचारणा केली असता भोळेने सांगीतले की, ‘२० रुपये भाऊसाहेब आणि साहेबाच्या स्टारचे १००, आणि ज्युनिअरचे ५० रुपये असे १७० रुपये आणि आपला पोरगा फी घेतो ३० रुपये’ असे २०० रूपये भोळेने लाच मागीतली. भोळेच्या सांगीतल्यानुसार, ढेंगे अकील नावाच्या मुलाकडे गेले. दोघांमध्ये पैशांबाबत बोलणी झाली. २०० रुपये नंतर देणार असल्याचे ढेंगेंनी सांगीतले. यांनतर ढेंगे पुन्हा एसीबीच्या पथकाकडे आले होते.

क्लिक करा आणि वाचा- परमबीर सिंग यांना कोर्टाचा मोठा धक्का; अजामीनपात्र वॉरंट जारी

भोळे व अकील याांच्याशी झालेल्या संवादाचे रेकॉर्डींग झालेले होते. त्यावरुन भोळे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. काही वेळातच ढेंगे प्रत्यक्ष लाच देण्यासाठी गेले. परंतु, नंतर भोळे भेटला नाही. यानंतर पुन्हा एकदा आरटीओ कार्यालयात सापळा रचण्यात आला, यावेळी देखील भोळे भेटला नाही. भोळेला कारवाईचा संशय आल्यामुळे तो आता पैसे घेणार नाही. त्याने आरटीओ लोही यांचा खासगी व्यक्ती म्हणून २०० रुपयांची लाच मागीतल्याची तक्रार ढेंगे यांनी केली आहे. त्यानुसार गुरुवारी भोळेच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री म्हणाले,’इंधन दरवाढ ही आपल्या भल्यासाठीच, खरं की खोटं?’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: