हायलाइट्स:
- कोकणात महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड
- शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा घेतला हाती
- जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनिल तटकरे, आमदार शेखर निकम, माजी आमदार संजय कदम, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश कार्यक्रम झाला. दापोली येथील कुणबी सेवा संघाच्या सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृहात आज हा सोहळा पार पडला.
‘आम्ही शिवसेनेचे निष्ठेने काम केले, मात्र २५ वर्षे आम्हाला केवळ आश्वासन दिले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आम्ही कुणबी समाजहिताच्या मागण्या केल्या, त्या मान्य करून त्यांनी आर्थिक तरतूदही केली. यासाठी सुनील तटकरे व काही नेत्यांनी सहकार्य केले. आता आम्हाला जे सेनेचे आमदार ओळखत नाही, तेही भविष्यात ओळखतील, असं काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून करून दाखवू,’ अशी भूमिका संदीप राजपुरे आणि शंकर कांगणे यांनी मांडली आहे.
दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, अजय बिरवटकर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते मुजीब रुमाणे, सुरेश मोरे-कामगार सेल जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष व नगरसेवक खालिद रखांगे, राष्ट्रवादीचे दापोली तालुकाध्यक्ष जयवंतशेठ जालगांवकर, दापोली पं. स.सभापती योगिता बांद्रे, राजेश गुजर, जि. प.सदस्य नेहा जाधव, राष्ट्रवादीचे खेड तालुकाध्यक्ष सतु कदम, राष्ट्रवादीचे मंडणगड तालुकाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.