Eknath Khadse: ‘या’ निवडणुकीत भाजपला मोठा धक्का; एकनाथ खडसे बिनविरोध!


हायलाइट्स:

  • जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत नवी घडामोड.
  • भाजपच्या बाद उमेदवारांना दिलासा नाहीच.
  • विभागीय आयुक्तांनी चारही हरकती फेटाळल्या.

जळगाव:जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत छाननीअंती बाद झालेल्या भाजप उमेदवारांच्या हरकती विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावल्या आहेत. माजी आमदार स्मिता वाघ, मुक्ताईनगर येथील नाना पाटील, माधुरी अत्तरदे या तिघांसह अन्य चार जणांच्या हरकती विभागीय आयुक्तांनी फेटाळल्या. जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. ( Jalgaon District Bank Election 2021 Updates )

वाचा: वानखेडेंवरील खंडणीचा आरोप: पोलीस प्रभाकरसह पोहचले ‘त्या’ स्पॉटवर

जळगाव जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननी प्रक्रियेत भाजपच्या स्मिता वाघ, माधुरी अत्तरदे, भारती चौधरी, नाना पाटील यांच्यासह खासदार रक्षा खडसे यांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले होते. यावर भाजपच्या उमेदवारांनी आक्षेप घेत, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. यावर मंगळवारी कामकाज झाले होते. त्यानंतर गुरुवारी विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्णयात भाजपच्या उमेदवारांना मोठा धक्का बसला. स्मिता वाघ यांचा अर्ज बाद झाल्यामुळे अमळनेर येथे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील तर मुक्ताईनगर मधून नाना पाटील यांचा अर्ज बाद झाल्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांची निवड बिनविरोध झाल्याचे निश्चित झाले आहे.

वाचा: आर्यन खानला ‘असा’ मिळाला जामीन; ‘ही’ दोन नावं घेत रोहतगी म्हणाले…

दरम्यान, विभागीय आयुक्तांवर सत्तेचा गैरवापर करून दबाव टाकण्यात आल्याचा आरोप भाजपचे अरविंद देशमुख यांनी केला आहे. या निवडणुकीत सुरुवातीपासूनच अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. प्रथम सर्वपक्षीय पॅनलसाठी बैठका झाल्या होत्या पण नंतर बिनसलं. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी भाजपला दूर लोटलं. त्यानंतर अर्ज छाननी प्रक्रियेत भाजप उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने वादळ उठले. आता या उमेदवारांची हरकतही फेटाळली गेल्याने संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

वाचा: समीर वानखेडे यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; अटक करायची असल्यास…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: