अखेर डीकॉकने मागितली माफी; विश्वचषकात कोणती गोष्ट करण्यास नकार दिला होता जाणून घ्या…


T20 World Cup 2021 : दुबई : दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात केलेल्या कृत्याबद्दल अखेर माफी मागितली आहे. कॅरेबियन संघाविरुद्धच्या सामन्यात त्याने गुडघे टेकण्यास नकार दिला होता. यामुळे त्याने सामना सुरू होण्यापूर्वीच प्लेइंग इलेव्हनमधून आपले नाव मागे घेतले, पण आता डी कॉकला आपल्या कृत्याची लाज वाटली असून, त्याने सहकारी खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांची माफीही मागितली आहे.

खरं तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने प्रत्येक सामन्यापूर्वी सर्व खेळाडूंना गुडघे टेकावे लागतील, अशा सूचना दिल्या होत्या. क्विंटन डी कॉकने क्रिकेट बोर्डाच्या या सूचनेचे पालन करण्यास नकार दिला आणि सामन्यातून बाहेर बसण्याचा निर्णय घेतला होता, पण आता त्याने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. जर गुडघे टेकल्याने लोकांमध्ये जागरुकता पसरत असेल, त्यांचे आयुष्य अधिक चांगले होत असेल, तर असे करण्यास मी आनंदाने तयार आहे, असे डी कॉकने म्हटले आहे.

डी कॉकची माफी
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात डी कॉकने म्हटले आहे की, “माझे संघ सहकारी आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट चाहत्यांची मला माफी मागायची आहे. मला हा चर्चेचा मुद्दा बनवायचा नव्हता. माझ्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि या देशासाठी क्रिकेट खेळण्यापेक्षा दुसरे काहीही महत्त्वाचे नाही. मला माझ्या देशासाठी पुन्हा क्रिकेट खेळायचे आहे. मला विश्वचषक जिंकायचा आहे. एक खेळाडू म्हणून मला माझी जबाबदारी समजते. वंशवादाच्या विरोधात उभे राहणे काय असते, हे देखील मला माहीत आहे. माझ्या गुडघ्यावर बसून लोकांमध्ये जागरुकता निर्माण होत असेल, तर यापेक्षा जास्त आनंदी गोष्ट माझ्यासाठी दुसरी कोणती नाही.”

आंतरराष्ट्रीय करिअरचा धोका टळला
दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, डी कॉकने गुडघ्यावर बसण्यास नकार दिल्याने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड चांगलेच संतापले होते. डी कॉकवर मोठी कारवाई करण्याच्या ते तयारीत होते. यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला ग्रहण लागू शकले असते, पण आता त्याच्या माफीनंतर त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवरील धोका टळला आहे. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना डी कॉकशिवायही जिंकला. आता दक्षिण आफ्रिका सुपर १२ मधील पुढील सामना डी कॉकसह जिंकताना दिसू शकेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: