काशिफ खान हा आंतरराष्ट्रीय ड्रग माफीया- मलिक
काशिफ खान हा आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. समीर वानखेडे यांचे काशिफ खानसोबत संबंध असल्याचेही मलिक यांनी सांगितले आहे. या संबंधांमुळे समीर वानखेडे याने काशिफ खानला अटक केली नाही किंवा त्याची चौकशीही केली गेली नाही, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. क्रूझवरील रेव्ह पार्टीसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. अखेर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो काशिफ खानवर कारवाई का करत नाही?, असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे.
क्लिक करा आणि वाचा- आर्यनला जामीन मिळताच शाहरुख रिलॅक्स; रोहतगी, मानेशिंदे म्हणाले…
काशिफ खान तिहार तुरुंगातही कैद होता- मलिक
ज्या कार्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने कारवाई केली ती पार्टी याच काशिफ खानने आयोजित केली होती असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. त्या पार्टीत त्याची मैत्रीणही बंदूक घेऊन हजर होती. काशिफ खान याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून तो एकेकाळी तिहार तुरुंगात कैद होता, अशी माहितीही मलिक यांनी दिली आहे. ड्रग पार्टीचा आयोजक असतानाही एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता त्याला सोडून दिले. तर, इतरांना मात्र अटक केली असा गंभीर स्वरुपाचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
वाचा: समीर वानखेडे यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; अटक करायची असल्यास…
प्रेयसीसोबत क्रूझवर डान्स
काशिफ खान हा ड्रग माफिया असून तो क्रूझवर आपल्या प्रेयसीसोबत नाचत होता. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज दिले गेलेले नाही. समीर वानखेडेने जर ते सीसीटीव्ही फुटेज दिले नाही, तर ते आम्ही देऊ असे मलिक यांनी म्हटले आहे. काशिफ खान हा कोण आहे? तो कोणत्या देशाचा नागरिक आहे?, त्याच्यावर देशात किती गुन्हे दाखल आहेत? याची उत्तरे अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) सांगितले पाहिजे. याबाबतही तपास व्हायला पाहिजे. जर तसे झाले नाही, तर संपूर्ण एनसीबीच भ्रष्ट आहे असे आम्हाला वाटेल असे मलिक म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- परमबीर सिंग यांना कोर्टाचा मोठा धक्का; अजामीनपात्र वॉरंट जारी
काशिफ खानची चौकशी केली गेली नाही- मलिक
समीर वानखेडे यांचा ‘दाढीवाला‘ मित्र काशिफ खान हा क्रूझवर उपस्थित होता. मात्र त्याची स्कॅनिंग केली गेली नाही असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. केवळ सापळा रचून लोकांना अटक केलेल्यांना फसवण्यात आले. जे फोटो दाखवण्यात आले ते एनसीबी कार्यालयातील आहेत. समीर वानखेडे यांना सॅम डिसोझाबाबतही खुलासा करावा लागेल, असेही नवाब मलिक म्हणाले.