BMC Elections: मुंबईत पालिका निवडणुकीचे पडघम; मतदारांसाठी ‘ही’ अत्यंत महत्त्वाची बातमी


हायलाइट्स:

  • मुंबई महापालिकेकडून निवडणुकीची तयारी सुरू.
  • मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर.
  • ५ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध होणार अंतिम यादी.

मुंबई: राज्यात महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्यासाठी पूर्वतयारी जोरात सुरू झाली आहे. मुंबई महापालिका प्रशासन स्तरावरही ही लगबग पाहायला मिळत असून पालिकेने आज पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला. मुंबईतील मतदारांच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब आहे. ( BMC Elections 2022 Latest Update )

वाचा: करोना: राज्यात आज १,४१८ नव्या रुग्णांचे निदान, मृ्त्यूसंख्या वाढली

मुंबई पालिकेकडून १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घेतला जाणार आहे. यात अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या व्यक्तीस त्याच्या संबंधित विधानसभा मतदार यादीत नाव नोंदविता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मतदार यादीतील नाव व पत्ता दुरुस्त करायचा असल्यास करू शकता, असे आवाहनही करण्यात आले आहे.

वाचा: मोठी बातमी: आर्यन खानला अखेर जामीन; आज सुटका नाही, कारण…

मतदार यादीत ऑनलाइन नाव नोंदणी करण्यासाठी www.nvsp.in व www.ceo.maharashtra.nic.in ही संकेतस्थळे उपलब्ध करण्यात आली आहेत. मतदार नाव नोंदणी माहिती घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक १९५० उपलब्ध असेल. मतदार यादीशी संबंधित सर्व दावे व आक्षेप दिनांक २० डिसेंबर पर्यंत निकाली काढले जाणार आहेत व ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. अंतिम प्रसिद्ध मतदार यादी मुंबई महानगरपालिकेच्या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येईल, असेही महापालिकेने म्हटले आहे.

वाचा: समीर वानखेडे यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; अटक करायची असल्यास…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: