पाकिस्तानच्या संघात उडाली एकच खळबळ; तीन खेळाडू सापडले करोना पॉझिटीव्ह…


इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये सध्या जल्लोषाचे वातावरण आहे. कारण त्यांचा पुरुष संघ टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे, पण याच दरम्यान पाकिस्तानच्या महिला संघाच्या शिबिरातून एक वाईट बातमी आली आहे. पाकिस्तानच्या ३ महिला क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. पीसीबीने गुरुवारी (२८ ऑक्टोबर) एका निवेदनाद्वारे याबाबतची माहिती दिली.

पाकिस्तानी महिला संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे. यानिमित्ताने कराचीतील हनिफ मोहम्मद हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये संघाचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले होते. या शिबिरात बुधवारी सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यात ३ खेळाडू पॉझिटिव्ह आढळले आहेत.

पाकिस्तानच्या कोणत्या ३ खेळाडूंना कोरोना झाला आहे, याबाबतचा खुलासा करण्यात आलेला नाही. पीसीबीनेही याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही, पण या तिन्ही खेळाडूंना २ नोव्हेंबरपर्यंत आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. यादरम्यान या तिन्ही खेळाडूंची दर दुसऱ्या दिवशी कोविड चाचणी होईल. सराव शिबिरात भाग घेण्यापूर्वीच या तिन्ही खेळाडूंना कोरोना विषाणू प्रतिबंधकच्या दोन्ही लसी मिळाल्या होत्या.

वेस्ट इंडिजचा संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. पहिला एकदिवसीय सामना ८ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. दुसरा सामना ११ नोव्हेंबरला आणि शेवटचा एकदिवसीय सामना १४ नोव्हेंबरला होणार आहे. याच वर्षी पाकिस्तानच्या महिला संघाने वेस्ट इंडिजचा दौरा केला होता, ज्यामध्ये त्यांनी तीन टी-२० आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली होती. वेस्ट इंडिज क्रिकेटच्या सीईओंनी त्याच वेळी आपल्या संघाला पाकिस्तान दौऱ्यावर पाठविण्याचे आश्वासन दिले होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: