rahul gandhi : ‘पेट्रोल, डिझेलचे दर १०० रुपये प्रतिलिटरवर, मोदीजी हेच का अच्छे दिन?’


नवी दिल्लीः पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा केंद्र सरकारला ( Petrol Diesel Prices Rahul Gan ) घेरण्याचा प्रयत्न केला आहे. पेट्रोल, डिझेलचे दर रोज वाढत आहेत. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. हेच का अच्छे दिन?, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. राहुल गांधी एक बातमी ट्विट करत केंद्र सरकारला पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरून सवाल केला आहे. हे कुठल्या बाजूने ( ये किस ऐंगल से अच्छे दिन हैं? ) अच्छे दिन आहेत?, असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला आहे. तसंच सरकारची कर खंडणी सुरू आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी #TaxExtortion या हॅशटॅगमधून केला आहे.

पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरावरून राहुल गांधींचा हल्लाबोल


prashant kishor : पुढील अनेक दशकं भाजपच सत्तेत राहणार! प्रशांत किशोर यांच्या दाव्यात किती दम? वाचा…

मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या दरांचा केला नवा रेकाॅर्ड

पेट्रोलियम आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. आज देशभरात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी ३५ पैशांनी महागले. ज्यामुळे मुंबईत पेट्रोलचा भाव ११४ रुपयांवर तर डिझेल १०५ रुपयांवर गेले आहे. मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव १०५.१२ रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत डिझेल ९७.०२ रुपये इतके वाढले आहे. चेन्नईत १०१.२५ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव १००.१४ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १०६.३२ रुपये असून बंगळुरात डिझेल १०२.९२ रुपये आहे.

prashant kishor : मोदी असो वा नसो, अनेक दशकं भाजपच शक्तीशाली राहणार, राहुल गांधी अद्याप गैरसमजातः प्रशांत किशोरSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: