हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात १ हजार ४१८ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण २ हजार ११२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण ३६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज राज्यात झालेल्या ३६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ४५ हजार ४५४ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५४ टक्के इतके आहे.
क्लिक करा आणि वाचा- परमबीर सिंग यांना कोर्टाचा मोठा धक्का; अजामीनपात्र वॉरंट जारी
सक्रिय रुग्णसंख्या १८ हजारांवर
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १८ हजार ७४८ इतकी आहे. काल ही संख्या १९ हजार ४८० इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ३ हजार ९२९ इतकी आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ३ हजार ००५, तर अहमदनगरमध्ये ही संख्या २ हजार ०४८ इतकी आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ५८८ अशी आहे. तसेच, सांगलीत एकूण ४३५ इतकी आहे. तर, सोलापुरात ही संख्या ४३४ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा- अण्णा हजारेंना वंदन म्हणजे ईश्वराला वंदन, त्यांनी मोदींनाही रस्ता दाखवला; राज्यपालांची स्तुतिसुमने
मुंबईत उपचार घेत आहेत ४,९४४ रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ९४४ इतकी आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४८५, रत्नागिरीत १८८ इतकी कमी झाली आहे, तर सिंधुदुर्गात ती ३५५ इतकी आहे.
नंदुरबार जिल्ह्यात एकही सक्रिय रुग्ण नाही
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ३८७, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७८ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या १८ वर आली आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात आज एकही सक्रिय रुग्ण नाही.
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री म्हणाले,’इंधन दरवाढ ही आपल्या भल्यासाठीच, खरं की खोटं?’
१,७१,२०० व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी २३ लाख १६ हजार ९१० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख ०७ हजार ९५४ (१०.६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ७१ हजार २०० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ८९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.