धक्कादायक! युट्यूब व्हिडिओ पाहून १७ वर्षीय मुलीने दिला बाळाला जन्म, आई-वडिलांपासून गर्भधारणा लपवली


तिरुवनंतपूरमः केरळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय मुलीने आपल्या घरीच बाळाला जन्म दिला. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीने यूट्यूब पाहून बाळाची प्रसूती केली. विशेष म्हणजे आई-वडिलांनाही तिच्या गरोदरपणाची माहिती नव्हती. पोलिसांनी या प्रकरणी तिच्या २१ वर्षीय प्रियकराला अटक केली आहे.

हे प्रकरण केरळमधील मल्लापूरम जिल्ह्यातील आहे. इथे २० ऑक्टोबरला एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला. प्रसूतीनंतर तीन दिवसांनी मुलीच्या अंध आईला बाळाची माहिती मिळाली. प्रसूतीनंतर मुलीने तीन दिवस स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं. पण प्रसूतीनंतर संसर्ग झाल्यामुळे तिला बाळासह खोलीबाहेर यावं लागलं. तिथून तिला आणि बाळाला रुग्णालयात नेण्यात आलं.

शेजारचा २१ वर्षांचा तरुण बाळाचा पिता

बाल कल्याण समितीने (CWC) पोलिसांना या गर्भधारणेबद्दल सांगितलं. मुलीच्या शेजारी राहणाऱ्या २१ वर्षीय मुलाने प्रसूतीच्या वेळी युट्यूब पाहून गर्भाची नाळ कापण्याचा सल्ला दिल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

Karnataka: डेल्टा प्लसचे सात रुग्ण, कर्नाटकात परदेशी प्रवाशांसाठी नवी नियमावली

bus fell into a gorge : बस दरीत कोसळून भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, PM मोदींकडून मदत घोषित

आई-वडिलांना नव्हती गर्भधारणेची माहिती

घरात राहूनही आईला मुलीच्या गर्भधारणेची माहिती कशी मिळाली नाही? याबद्दल सीडब्ल्यूसीने आश्चर्य व्यक्त केलं आहे. आईला दिसत नाही आणि वडील सुरक्षा रक्षक आहेत. यामुळे ते रात्री घराबाहेर असतात. मुलगी ऑनलाइन क्लासेसमध्ये शिकण्यासाठी खोलीचं दार बंद ठेवते, असं आईला वाटत होतं. शेजारच्या आरोपी मुलाने मुलीच्या घरातील परिस्थितीचा फायदा घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

धक्कादायक! युट्यूब पाहून १७ वर्षीय मुलीने दिला बाळाला जन्म, आई-वडिलांपासून गर्भधारणा लपवली



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: