एका प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान प्रशांत किशोर यांनी राजकीय भाकीतं मांडली. ‘भाजप हा भारतीय राजकारणाचे केंद्र बनणार आहे. भाजप जिंकेल किंवा हरेल. पण स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या ४० वर्षांत काँग्रेसची जी स्थिती होती, तशीच आता भाजपची आहे. भाजप आता हटणार नाही. एकदा तुम्हाला राष्ट्रीय स्तरावर एकदा ३० टक्क्यांहून अधिक मते मिळाली, तर तुम्ही लवकर हटू शकत नाही’, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे. ‘नागरिक नाराज आहेत आणि ते संतापले आहेत आणि यामुळे ते मोदींना सत्तेबाबहेर करतील, या गैरसमजात कुणीही राहू नये. हा मोदींना उखडून टाकू शकतात. पण भाजप हटणार नाही. पुढील अनेक दशकं भाजप सत्तेत किंवा शक्तीशाली राहिल’, असं राजकीय भाकीत प्रशांत किशोर यांनी केलं आहे.
अशिक्षितांच्या फौजा देश घडवू शकत नाहीत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विधान
‘मूळ समस्या राहुल गांधींची आहे. आता थोडाच वेळ आहे, जनता नरेंद्र मोदींना उखडून टाकेल, असं राहुल गांधींना वाटतंय. पण असं होणार नाही. जोपर्यंत तुम्ही त्यांची (पीएम मोदींची) ताकद समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांचा मुकाबला करू शकत नाही. तुम्ही त्यांना कधीही पराभूत करू शकत नाही, असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं.
UP Elections: पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांची सद्यस्थितीही जाणून घ्या… .
काँग्रेसमध्ये खोलवर समस्या आहेत आणि लखीमपूर खिरीच्या घटनेने पक्षाला नवसंजीवनी मिळणार नाही, असं काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर म्हणाले होते. प्रशांत किशोर हे प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयाचे श्रेय देखील त्यांच्या रणनीतींना दिले जाते. मात्र, नंतर भाजपशी त्यांचे मतभेद झाले. पुढच्याच वर्षी २०१५ मध्ये त्यांनी बिहारमध्ये जेडीयू-आरजेडी-काँग्रेस आघाडीसाठी काम केलं आणि या महाआघाडीने निवडणुकीत मोठा विजय मिळवला. मात्र, नंतर जेडीयूने महाआघाडी सोडली आणि भाजपसोबत परतले. अलिकडेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसी आणि तामिळनाडूमध्ये एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकच्या प्रचंड विजयामागे त्यांची रणनीती खूप महत्त्वाची मानली जात होती.