हायलाइट्स:
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंवर स्तुतिसुमने.
- अण्णा हजारे यांना वंदन म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरालाच वंदन ठरते- राज्यपाल कोश्यारी.
- अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांनाही रस्ता दाखवला- राज्यपाल कोश्यारी.
राज्यापाल कोश्यारी कालपासून अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी कृषी विद्यापीठातील कार्यक्रमानंतर त्यांनी आदर्शगाव हिवरेबाजारला भेट दिली. त्यानंतर ते राळेगणसिद्धी येथे गेले. तेथे हेलिपॅडवर त्यांचे स्वागत करण्यासाठी स्वत: हजारे उपस्थित होते. त्यानंतर राज्यपालांनी राळेगणसिद्धीतील विविध कामांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. उशीर झाल्याने अवघ्या मिनिटभरच ते बोलले.
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री म्हणाले,’इंधन दरवाढ ही आपल्या भल्यासाठीच, खरं की खोटं?’
ते म्हणाले, अण्णा हजारे यांना वंदन म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरालाच वंदन ठरते. त्यामुळे आधी हजारे यांना वंदन, नंतर तुम्हा ग्रामस्थांना आणि शेवटी ईश्वराला. तुम्ही सगळे चांगले काम करीत आहात. हजारे यांनी तुम्हा ग्रामस्थांना रस्ता दाखविला, आम्हाला दाखविला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही दाखविला. हजारे यांनी सोलर प्रकल्प राबविला. हा सोलर प्रकल्प पंतप्रधान मोदी देशभर राबवित आहे.
क्लिक करा आणि वाचा- समीर वानखेडेंची अडचण वाढणार? नवाब मलिक यांचा वानखेडेंवर मोठा आरोप
हजारे यांना अभिप्रेत असलेल्या अनेक योजना देशात राबविण्यात येत आहेत. संपूर्ण देशातील जनता राळेगणसिध्दीचे उदारण डोळयापुढे ठेवत आहे. हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ग्रामस्थ अतिशय चांगले काम करीत आहात. तुम्ही असेच काम करीत रहा. लवकरच उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनाही राळेगणसिध्दीला घेउन येतो. तुम्ही मला भेटायला मुंबईत राजभवनात केव्हाही येऊ शकता, असेही राज्यपाल म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानला अखेर जामीन; मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा