Rajasthan: पाकिस्तान विजयावर लिहिलं ‘आम्ही जिंकलो’, शिक्षिकेवर ओढावलं दुहेरी संकट


हायलाइट्स:

  • व्हॉटसअप स्टेटसवरून पोलिसांनी केली अटक
  • शाळेनं कामावरून कमी केलं.
  • कारवाईला सामोरं जावं लागल्यानंतर शिक्षिकेचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : गेल्या रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान टी २० मॅचमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर पाकिस्तानचा विजयाचा जल्लोष राजस्थानच्या एका शिक्षेकेला भारी पडलाय. या शिक्षकेला दुहेरी संकटाला सामोरं जावं लागलंय. यानंतर एका व्हिडिओद्वारे शिक्षिकेनं आपल्या कृत्यावरून स्पष्टीकरण दिलंय.

अटकेच्या कारवाईसोबत नोकरीही गमवावी लागली

नफीसा अटारी या उदयपूरच्या एका नीरजा मोदी या खासगी शाळेत शिक्षिका आहेत. गेल्या रविवारी २५ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानच्या विजयानंतर आपला आनंद जाहीर करत शिक्षिकेनं आपल्या व्हॉटसअप स्टेटसवर पाकिस्तानी खेळाडूंचा एक फोटो शेअर करत ‘We Won’ (आम्ही जिंकलो) असा मॅसेज लिहिला होता. याची तक्रार पोलिसांत करण्यात आल्यानंतर लोकांच्या भावना दुखावल्या प्रकरणी उदयपूरच्या अंबामाता पोलिसांनी शिक्षिकेला अटक केली. इतकंच नाही तर शाळेनंही शिक्षिकेवर कारवाई करत नफीसा यांना तडकाफडकी कामावरून कमी केलंय.

bus fell into a gorge : बस दरीत कोसळून भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, PM मोदींकडून मदत घोषित
Haryana: हरयाणात शेतकरी आंदोलनकर्त्या महिलांना ट्रकनं चिरडलं, तीन ठार

शिक्षिकेचं स्पष्टीकरण

कारवाईला सामोरं जावं लागल्यानंतर नफीसा अटारी यांनी आपला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडिओद्वारे त्यांनी आपल्या कृत्यावर स्पष्टीकरणही दिलंय. आपल्या पोस्टचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचं नफीसा यांनी म्हटलंय. ‘मॅच दरम्यान कुटुंबीय दोन टीममध्ये विभाजीत झालं होतं. माझी टीम पाकिस्तानचं समर्थन करत होती. तर कुटुंबातील इतर सदस्य भारतीय टीमचं… त्यामुळे पाकिस्तानची टीम मॅच जिंकल्यानंतर स्टेटसवर आम्ही जिंकलो असं म्हटलं होतं’, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.

‘पण, याचा अर्थ असा नाही की मी पाकिस्तानला पाठिंबा देते. मीदेखील एक भारतीय आहे आणि मीदेखील भारतावर तितकंच प्रेम करते जेवढं तुम्ही सर्व लोक करत आहात’ असंही नफीसा यांनी या व्हिडिओत म्हटलंय. नकळत कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यासाठी क्षमा करावी, असंही त्यांनी म्हटलंय.

‘अभाविप’कडून निषेध

नफीसा अटारी यांचं व्हॉटसअप स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर मोठी टीका झाली होती. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’शी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नीरजा मोदी शाळेत जाऊन राष्ट्रगीत गात राष्ट्रध्वज फडकावत नफीसा यांच्या कृत्याचा निषेध केला होता. उल्लेखनीय म्हणजे, वर्ल्डकपसारख्या टूर्नामेंटमध्ये गेल्या २९ वर्षांत पहिल्यांदाच भारताला पाकिस्तानकडून पराभवाला सामोरं जावं लागलंय.

Yogi Adityanath: पाकिस्तान क्रिकेट विजयाचा उत्सव, ‘देशद्रोहा’चा गुन्हा; योगींची इच्छा
UP Elections: पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांची सद्यस्थितीही जाणून घ्या…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: