bus fell into a gorge : बस दरीत कोसळून भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, PM मोदींकडून मदत घोषित


श्रीनगरः जम्मू-काश्मीरमध्ये मिनी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाल आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही बस ठाथरीहून डोडा जिल्ह्यातील डोडाला जात होती.

बसला झालेल्या अपघातानंतर तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं. बस दरीत कोसळली, त्या ठिकाणी वेगाने बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती डोडाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी दिली. ठाथरी येथील अपघातात एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉ. राजेंद्र सिंह यांनी दिली आहे.

आपण आताच डोडाचे जिल्हाधिकारी विकास शर्मा यांच्याशी फोनवर बोललो. या घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने डोडाच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जी काही आवश्यक मदत असेल ती सर्व दिली जाईल, असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्विट करून सांगितलं.

Haryana: हरयाणात शेतकरी आंदोलनकर्त्या महिलांना ट्रकनं चिरडलं, तीन ठार

पंतप्रधान मोदींनीही या अपघातातील मृतांबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत देण्यात येईल. तसंच जखमींना ५० हजारांची मदत दिली जाईल, अशी घोषणा पीएम मोदींनी केली.

UP Elections: पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांची सद्यस्थितीही जाणून घ्या… .

जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांच्या कार्यालयाकडूनही माहिती देण्यात आली आणि मदतही घोषित करण्यात आली आहे. डोडा येथील अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना राज्यपाल मदत निधीतून २ लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसंच रस्ते अपघात मदत निधीतून १ लाख रुपये दिले जातील. जखमींना लवकरात लवकर उपचार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व घटनेवर आपण बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आवश्यक ती अधिकची मदतही दिली जाईल, असं नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी म्हटलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: