हायलाइट्स:
- नवाब मलिक-समीर वानखेडे वादावर जितेंद्र आव्हाड बोलले
- क्रांती रेडकर यांना दिला सूचक इशारा
- इतिहास काढला तर ‘हमाम में सब नंगे’ – आव्हाड
आर्यन खान ड्रग्ज प्रकरण बोगस असून समीर वानखेडे यांनी खंडणीसाठी ते घडवून आणल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्याचा पुरावा म्हणून समीर वानखेडे यांनी स्वत:च्या खासगी आयुष्यात केलेल्या काही घोटाळ्यांबाबतही नवाब मलिक यांनी कागदपत्रे मीडियात जाहीर केली आहेत. वानखेडे यांनी जात व धर्म बदलल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे. त्यांच्या आरोपांमुळं वानखेडे कुटुंबाबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. समीर वानखेडे यांच्या पत्नी, अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी हे आरोप खोडून काढले आहेत. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहून योग्य न्याय देण्याची मागणी केली आहे. नवाब मलिक हे आम्हाला बदनाम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
वाचा: समीर वानखेडेंची चौकशी सुरू असतानाच जयंत पाटील यांचं मोठं विधान
त्याबाबत जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी जास्त बोलणं टाळलं. ‘नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्या वादात मला पडायचं नाही. बरीच माहिती उघड होऊ शकते. क्रांती रेडकर यांनी आरोप करताना सांभाळून बोलावं इतकंच माझं सांगणं आहे. प्रत्येक जण दुसऱ्याचा मागचा इतिहास काढायला लागला तर ‘हमाम में सब नंगे है…’, असं आव्हाड म्हणाले.
पप्पू कलानी यांच्या कुटुंबीयांसह ‘टीम ओमी कलानी’ पक्षाच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच जाहीर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यांच्या प्रसंगी ते बोलत होते.
वाचा: क्रांती रेडकर हिचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाली, आज बाळासाहेब असते तर…