पॉर्न वेबसाइटवर गणिताची शिकवणी; वर्षाला होतेय कोटींची कमाई!


तैपई: पॉर्नहब या वेबसाइटचे नाव ऐकताच डोक्यात एकच गोष्ट येते ती म्हणजे पोर्नोग्राफी. पॉर्न चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या वेबसाइटचा वापर चक्क गणित विषय शिकवण्यासाठी करत आहे, असे कोणी सांगितले तर विश्वास बसणार नाही. मात्र, ही किमया एकाने केली. पॉर्न वेबसाइटवर चक्क गणिताची शिकवणी एकाने सुरू केली आहे. चांग्शू असे या शिक्षकाचे नाव असून ते तैवानचे आहेत.

पॉर्नहब या वेबसाइटवरही त्यांच्या गणिताच्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळत आहेत. पॉर्न पाहायला येणारे गणिताचे धडे गिरवत असल्याचे चित्र आहे. या व्ह्यूजमधून चांग्शू दरवर्षी दोन कोटी रुपयांची कमाई करतात.

चांग्शू यांचे या वेबसाइटवर changshumath666 हे व्हेरिफाइड अकाउंट आहे. या हॅण्डलच्या माध्यमातून त्यांनी व्हिडिओ अपलोड केले आहेत. चांग्शू यांनी पॉर्नहबवर गणिताची शिकवणी सुरू करण्याआधी XVideos सह इतर पॉर्न वेबसाइटवरही गणित शिकवण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना तिथं फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तर, काही पॉर्न वेबसाइटनी हे व्हिडिओ टाकण्यास नकार दिला. मात्र, पॉर्नहबने चांग्शू यांना गणिताचे व्हिडिओ प्रकाशित करण्यास परवानगी दिली.
‘या’ देशात पालकांच्या संमतीनंतरच लहान मुलांना फेसबुक वापरण्यास मुभा!
चांग्शू यांनी म्हटले की, फारच कमी लोक वयस्करांसाठी असलेल्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर गणित शिकवतात आणि हे व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे मीदेखील गणित शिकवण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा विचार केला. या ठिकाणी व्हिडिओ अपलोड केल्यास अनेकजण हा व्हिडिओ पाहतील असा विश्वास होता.

चांग्शू यांनी म्हटले की, पॉर्न साइटला भेट देणाऱ्या लोकांना कदाचित माझ्या व्हिडिओत फार रस नसेल. मात्र, पॉर्न साइटवर एक शिक्षक गणित कसा शिकवतो हे पाहण्यासाठी अनेक जण येत असतील. त्यातील फार कमी जणांना गणित शिकण्याची आवड असू शकते. त्यातील अनेकजणांना कठीण गणिते सहजपणे कशी सोडवली जातात हे पाहण्यासाठी व्हिडिओ पाहत असतील, असेही त्यांनी सांगितले.

ब्रिटनमध्ये आढळला जगातील सर्वात महागडा मासा; एका माशाची किंमत लाख रुपयांहून अधिक

चांग्शू यांनी पॉर्नहबवर अधिकाधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहण्याचे आवाहन केले. त्यामाध्यमातून दरवर्षी २,५०,००० डॉलर इतकी रक्कम मिळू शकते. या रक्कमेतून चांग्शू हे आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्च भागवू शकतात.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: