पाकिस्तान: ‘टीएलपी’चा हिंसाचार; चार पोलिसांचा मृत्यू


इस्लामाबाद: पाकिस्तानमधील परिस्थिती पुन्हा एकदा चिघळत चालली आहे. पंजाब प्रांतातील कट्टरतावादी संघटना तहरिक-ए-लबैक (टीएलपी) या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हिंसाचारात चार पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तान सरकार आणि टीएलपी कार्यकर्त्यांच्या दरम्यान झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर हा हिंसाचार झाला. टीएलपीने पक्षाचा नेता साद रिझवी याची सुटका आणि फ्रान्सच्या राजदूताला माघारी पाठवणे आदी मागण्या केल्या आहेत.

बंदी असलेल्या टीएलपीने इस्लामाबादच्या दिशेने मोर्चा काढण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना अटकाव केला. त्यानंतर हिंसाचार सुरू झाला. कामुनकेजवळ ८ ते १५ हजार टीएलपी कार्यकर्ते होते. यातील बहुतांशीजणाकडे अत्याधुनिक शस्त्रे आहेत. पोलिसांविरोधात एके-४७ चा वापर करण्यात आला असल्याचा आरोप पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी केला.
पाकिस्तान: विजयाचा जीवघेणा जल्लोष!; कराचीत हवेत गोळीबार, १२ जखमी
गृहमंत्री शेख राशिद यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, टीएलपीने हिंसाचार सुरू केला आहे. त्यांच्याकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये पोलिसांचा मृत्यू झाला. तर, ७० जण जखमी आहेत. त्यातील आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आगामी ६० दिवसांसाठी पंजाब प्रांतात पाकिस्तानी लष्कराचे रेंजर तैनात करण्यात येणार आहेत.
बांगलादेशमध्ये हिंदूंविरोधात हिंसाचार; ६८३ जणांना अटक, मुख्य आरोपीकडून गुन्ह्याची कबुली
दरम्यान, याआधी पाकिस्तान सरकारने टीएलपी बाबत नरमाईची भूमिका घेतल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. टीएलपीच्या कार्यकर्त्यांनी २२ ऑक्टोबर रोजी लाहोरसह अनेक शहरांमध्ये हिंसक आंदोलन केले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: