Yogi Adityanath: पाकिस्तान क्रिकेट विजयाचा उत्सव, ‘देशद्रोहा’चा गुन्हा; योगींची इच्छा


हायलाइट्स:

  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२
  • पाकिस्तानचं समर्थन देशद्रोह ठरणार
  • उत्तर प्रदेशात सहा जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ ची घोषणा होण्यापूर्वी राज्यातील वेगवेगळ्या घडामोडी देशाचं लक्ष वेधून घेत आहेत. याच दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका घोषणेची देशात चर्चा सुरू झालीय. भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या टी २० सामन्यात भारताच्या पराभवानंतर फटाके फोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केलीय.

पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष साजरा करत फटाके फोडणाऱ्यांविरोधात ‘देशद्रोहा’चा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणात जवळपास सहा जणांवर आधीच गुन्हे दाखल केले आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर या आरोपींवर आता ‘देशद्रोहा’चा गुन्हाही दाखल केला जाणार आहे.

Haryana: हरयाणात शेतकरी आंदोलनकर्त्या महिलांना ट्रकनं चिरडलं, तीन ठार
अशिक्षितांच्या फौजा देश घडवू शकत नाहीत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विधान
देशाविरुद्ध कोणताीही घटना घडली तर त्याबाबत ताबडतोब देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जावा असे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान टी-२० मॅचमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाल्यानंतर काश्मिर, पंजाब, उत्तर प्रदेशसहीत काही राज्यांत फटाके फोडून घोषणाबाजी करण्यात आल्याचं समोर आलं होतं. ही घटना राज्य सरकारनं गंभीरतेनं हाताळण्याचा निर्णय घेतलाय. अशा लोकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत असल्याचं उत्तर प्रदेशचे डीजीपी मुकुल गोयल यांनी म्हटलंय.

उत्तर प्रदेशात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैंकी एक व्यक्ती बदायूचा रहिवासी आहे. २४ ऑक्टोबर रोजी या व्यक्तीनं फेसबुकवर पाकिस्तानच्या झेंड्यासहीत पाक समर्थनार्थ पोस्ट लिहून आपला आनंद व्यक्त केला होता. दुसऱ्या एका प्रकरणात बरेलीच्या दोन जणांवर पाकिस्तानच्या समर्थनार्थ व्हॉटसअप स्टेटस ठेवण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखीन एका घटनेत सीतापूरमध्येही एका व्यक्तीला पाकिस्तानच्या समर्थनार्थ व्हॉटसअप स्टेटस ठेवल्यानं अटक करण्यात आलीय.

Karnataka: डेल्टा प्लसचे सात रुग्ण, कर्नाटकात परदेशी प्रवाशांसाठी नवी नियमावली
rahul gandhi : ‘पेगाससला मंजुरी PM मोदींनी दिली की गृहमंत्री शहांनी?’, राहुल गांधींचा बोचरा सवालSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: