किरण गोसावीच्या मदतीसाठी कोणता नेता पुढं येणार? चर्चेला उधाण


हायलाइट्स:

  • आर्यन प्रकरणातील फरार पंच किरण गोसावीला अटक
  • अटक होताच म्हणतो, मी तर मराठी माणूस
  • राजकीय नेत्यांकडं केली मदतीची मागणी

मुंबई:आर्यन खान ड्रग्ज प्रकरण (Aryan Khan Drug Case) संशयास्पद असल्याचं समोर आल्यानंतर फरार झालेला या प्रकरणातील पंच किरण गोसावी (Kiran Gosavi) याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अटकेमुळं अनेक मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. मात्र, अटकेआधीच किरण गोसावीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यानं मदतीसाठी राज्यातील नेत्यांना साद घातली आहे. आता त्याच्या बचावासाठी राज्यातला कोणता नेता पुढं येतो, याबद्दल उत्सुकता आहे.

वाचा: बेड्या पडताच किरण गोसावी म्हणाला, ‘मी मराठी माणूस; कोणीतरी माझ्या…’

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात २ ऑक्टोबर रोजी एनसीबीनं अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह अन्य काही जणांना अटक केली. या अटकेबाबत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी संशय व्यक्त करून काही फोटो प्रसिद्ध केल्यावर प्रचंड खळबळ उडाली. एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. पाठोपाठ मलिक यांनी एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर बोगस कारवाईचे आरोप केले. आर्यन खान प्रकरणात छापे टाकणाऱ्यांमध्ये भाजपच्या काही लोकांचाही समावेश होता, असा आरोप त्यांनी केला. पंच म्हणून उभा करण्यात आलेले लोक स्वत: आरोपींना पकडून एनसीबीच्या कार्यालयात नेत असल्याचं समोर आलं. किरण गोसावी हा त्यातील प्रमुख संशयित होता. मलिक यांनी यात भाजपचं नाव घेतल्यामुळं प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. भाजपनंही मलिक यांना उत्तर दिलं. शाहरुख खानच्या मुलावर कारवाई झाल्यामुळं मलिक सुडापोटी आरोप करत आहेत, असं म्हणत भाजपच्या नेत्यांनी या प्रकरणाला हिंदू-मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचं दिसलं. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या व्यक्तिगत टीकेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

वाचा: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना करोनाची लागण

आता किरण गोसावी यानं या प्रकरणात ‘मराठी माणूस’ हा मुद्दा आणला आहे. पुणे पोलिसांनी अटक करण्याआधीचा किरण गोसावी याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्यानं राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना व अन्य नेत्यांनाही मदतीची साद घातली आहे. मी मराठी माणूस आहे. त्यामुळं कुणीतरी माझ्या मागे उभं राहावं आणि मी जे काही सांगतोय त्याची चौकशी करावी, असा आग्रह पोलिसांकडं धरावा,’ असं गोसावीनं म्हटलं आहे. गोसावी याच्या या आवाहनानंतर कोणता राजकीय नेता पुढे येतोय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: