अशिक्षितांच्या फौजा देश घडवू शकत नाहीत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विधान


वृत्तसंस्था, नवी दिल्ली :

‘अशिक्षितांच्या फौजांमुळे कोणताही देश विकसित होऊ शकत नाही,’ असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी म्हटले आहे. ‘ज्यांना स्वत:चे घटनात्मक अधिकार कळत नाहीत, असे लोक देशासाठी आपल्या क्षमतेनुसार पुरेपूर योगदान देऊ शकत नाहीत,’ असेही शहा म्हणाले.

अशिक्षित लोक चांगले नागरिक होऊ शकत नाहीत,’ असे शहा अलीकडेच म्हणाले होते. त्याचा पुनरुच्चारच शहा यांनी या वेळी केला. ‘विकासासाठी शिक्षण ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. मला यासाठी ट्रोल करण्यात आले; पण मी पुन्हा म्हणतो, की अशिक्षितांची फौज घेऊन कोणी देशाचा विकास करू शकत नाही.’

डिलिव्हरिंग डेमोक्रसी : रिव्ह्यूइंग टू डीकेड्स ऑफ पीएम नरेंद्र मोदी अॅज हेड ऑफ गव्हर्न्मेंट’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात ते बोलत होते. यापूर्वी शहा यांनी संसद टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत प्रथम अशिक्षितांविषयी विधान केले होते.

Agni-5 missile : अग्नी-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, ५ हजार किलोमीटरपर्यंत हल्ल्याची उच्च क्षमता
rahul gandhi : ‘पेगाससला मंजुरी PM मोदींनी दिली की गृहमंत्री शहांनी?’, राहुल गांधींचा बोचरा सवाल

‘मोदी हे देशाचे आजवरचे सर्वांत यशस्वी पंतप्रधान आहेत,’ असे सांगून शहा म्हणाले, ‘त्यांनी देशाच्या विकासातील जीडीपीच्या मानकाला मानवी चेहरा प्राप्त करून दिला. ते स्वत:ला प्रधानसेवक म्हणवून घेत असले, तरी त्यांच्यापेक्षा यशस्वी पंतप्रधान खचितच लाभला असेल.’ जम्मू-काश्मीरमधील कलम ३७ रद्द करण्याच्या निर्णयाचेही शहा यांनी समर्थन केले. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदींनी केलेल्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला.

‘नोटाबंदी यशस्वीच’

‘सन २०१६मध्ये करण्यात आलेली नोटाबंदी यशस्वी ठरली,’ असा दावा करून अमित शहा म्हणाले, ‘ती राजकीय जोखीम होती, पण पंतप्रधानांनी ती पत्करली. त्यानंतर काही दिवसांनीच उत्तर प्रदेशात निवडणूक होती, तरीही हा निर्णय घेतला गेला. ममता, कम्युनिस्ट, बसप, काँग्रेस या सर्वांनी विरोध केला; पण त्यांचा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. नोटाबंदीने देशाला ऑलनाइन व्यवहारांची सवय लावली.’

amarinder singh will meet amit shah : अमरिंदर सिंग अमित शहांना उद्या पुन्हा भेटणार, काय आहे मुद्दा?
ramdev baba : रामदेव बाबांना झटका! अॅलोपॅथी वादावर दिल्ली हायकोर्टाने बजावली नोटीस



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: