राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना करोनाची लागण


Authored by | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 28, 2021, 10:55 AM

करोनाची दुसरी लाट ओसरत असताना आणि राज्यातील सर्व व्यवहार हळूहळू खुले होत असतानाच, राज्य सरकारची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना करोनाची लागण झाली आहे.

 

दिलीप वळसे पाटील यांना करोना

हायलाइट्स:

  • राज्य सरकारची चिंता वाढवणारी बातमी
  • गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना करोनाची लागण
  • संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याचं केलं आवाहन

पुणे: करोनाची दुसरी लाट ओसरत असताना आणि राज्यातील सर्व व्यवहार हळूहळू खुले होत असतानाच, राज्य सरकारची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना करोनाची लागण झाली आहे.

वळसे पाटील यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ‘करोना सदृश्य लक्षणं दिसत असल्यानं मी माझी टेस्ट केली असून माझा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत,’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं व कोरोना नियमांचं काटेकोर पालन करावं,’ असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : state home minister dilip walse patil tested corona positive
Marathi News from Maharashtra Times, TIL NetworkSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: