Manish Bhangale: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवा धमाका; हॅकर मनीष भंगाळेच्या ‘या’ दाव्याने खळबळ


हायलाइट्स:

  • आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात हॅकर मनीष भंगाळेची एंट्री.
  • पुरावे टॅम्पर करण्यासाठी पाच लाखांची ऑफर मिळाली.
  • अलोक जैन, शैलेश चौधरी यांची नावे घेत केला दावा.

जळगाव: मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पुरावे टॅम्पर करण्यासाठी आपल्याला पाच लाखांची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक दावा आता जळगाव येथील हॅकर मनीष भंगाळे याने केला आहे. अभिनेता शाहरुख खान याची मॅनेजर पूजा ददलानी हिच्या मोबाइलचा सीडीआर काढण्यासाठी ही ऑफर दिल्याचा दावा भंगाळे याने केला. दरम्यान, क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुखचा मुलगा आर्यन खान अटकेत आहे. त्याला ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. ( Manish Bhangale On Aryan Khan Case )

वाचा: वानखेडेंवरील खंडणीच्या आरोपाचा मुंबई पोलिसांकडून तपास; NCB म्हणते…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे दाऊदच्या पत्नीशी संभाषण झाल्याचा दावा केल्याने काही वर्षांपूर्वी मनीष भंगाळे चर्चेत आला होता. आता आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात त्याने मोठा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात भंगाळे याने मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिले आहे व या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत असल्याने सखोल चौकशी करण्याची मागणी त्याने केली आहे. मनीष भंगाळेने पाच लाखांच्या ऑफरचा दावा करताना धक्कादायक माहिती दिली आहे. ‘६ ऑक्टोबर रोजी अलोक जैन आणि शैलेश चौधरी या दोन व्यक्ती मला भेटण्यासाठी जळगाव येथे आल्या होत्या. त्यांनी एका नंबरचा सीडीआर काढून मिळेल का?, असे विचारत पूजा ददलानी या नावाने सेव्ह असलेला नंबर मला दाखवला. तसेच त्यांनी एक व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा बॅकअपही दाखवला. तो बॅकअप आर्यन खान नावाने सेव्ह होता’, असे मनीष भंगाळे याने सांगितले. क्रूझ ड्रग्स प्रकरणात काहीतरी पाणी मुरत असल्यानेच आपण मुंबई पोलीस आयुक्तांना याबाबत एक पत्र लिहिले असून सखोल चौकशीची मागणी केल्याचेही भंगाळे म्हणाला.

वाचा: वानखेडे यांची ४ तास चौकशी; साईल आलाच नाही, आता गोसावीलाही…

पाच लाखांची ऑफर; तो नंबर सॅम डिसुझाचा!

‘हे काम केले तर तुला पाच लाख रुपये मिळतील, असे अलोक जैन व शैलेश चौधरी यांनी मला सांगितले. त्यासाठी त्यांनी अ‍ॅडव्हान्स म्हणून मला १० हजार रुपये दिले’, असा दावाही भंगाळे याने केला. जैन व चौधरी यांनी जाताना एक नंबर दिला. जो ट्रू कॉलरवर सॅम डिसुझा या नावाने दिसत आहे. या दोघा व्यक्तींनी प्रभाकर साईल या नावाने सीमकार्ड काढून मिळेल का, असेही आपणास विचारल्याची माहिती मनीष भंगाळे याने दिली. मागील काही दिवसांपू्र्वी आर्यन खान प्रकरणात प्रभाकर साईल याला टीव्हीवर पाहिल्यानंतर या गोष्टीचे गांभीर्य माझ्या लक्षात आले व ही माहिती मी समोर आणली, असे भंगाळेने सांगितले.

वाचा:समीर वानखेडे यांच्यावर कारवाई होईल का?; उज्ज्वल निकम यांनी मांडले महत्त्वाचे मतSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: