Mumbai Crime: मुंबई पोलिसांच्या ड्रोन वाहनाचा चालकच लाचखोरीत!; पानटपरीवाल्याला गाठले आणि…


हायलाइट्स:

  • मुंबईत लाचखोर हवालदाराला रंगेहाथ पकडले.
  • पानटपरीवाल्याकडून लाच घेत असताना कारवाई.
  • हवालदार पोलिसांच्या ड्रोन वाहनावर आहे चालक.

मुंबई: मुंबई पोलिसांच्या ड्रोन वाहनावर चालक असलेल्या हवालदार प्रकाश दळवी याला ५० हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने अटक केली. पानटपरी सुरू ठेवण्यासाठी गुटखा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून दळवीने लाच घेतली. ( Mumbai Police Constable Arrested )

वाचा: आर्यन खान प्रकरणात नवा धमाका; हॅकर मनीष भंगाळेच्या ‘या’ दाव्याने खळबळ

बंदी असूनही गुटखा, पानमसाला याचा व्यवसाय करणाऱ्यास जे. जे. मार्ग पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणात जामिनावर बाहेर आल्यानंतर या आरोपीने दक्षिण मुंबई मधील सुरती मोहल्ला येथे पानटपरी सुरू केली. प्रकाश दळवी हा मुंबई पोलीस मुख्यालयात ड्रोन वाहनावर कार्यरत असल्याने त्याला मुंबईतील गुन्ह्यांबाबत अपडेट माहिती होती. त्याने या आरोपीशी संपर्क केला.

वाचा: ड्रग्ज पार्टी प्रकरणात मुंबई पोलिसांची एंट्री; ‘त्या’ सर्व तक्रारींचा होणार तपास

पानटपरीचे दुकान सुरू ठेवण्यासाठी दरमहा २५ हजार आणि गुडलक म्हणून १ लाख रुपये दे, तुला व्यवसायात काहीच अडचण येणार नाही, असे दळवी याने संबधिताला सांगितले. इतकी रक्कम शक्य नसल्याने तडजोडीअंती ७५ हजार देण्याचे ठरले. आरोपीने पैसे द्यायचे नसल्याने ‘ अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो ‘कडे तक्रार केली. अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने लावलेल्या सापळ्यात लाचेचा पहिला ५० हजार रुपयांचा हफ्ता घेताना दळवी याला पकडण्यात आले.

वाचा: वानखेडेंवरील खंडणीच्या आरोपाचा मुंबई पोलिसांकडून तपास; NCB म्हणते…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: